देवाला सृष्टीतील कोणत्याच भौतिक गोष्टीची नसते अपेक्षा! फक्त भक्तांकडून भक्तीचीच असते अपेक्षा--ह. भ .प .संजयजी महाराज जगताप

शिर्डी (प्रतिनिधी) पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या कोपरगाव तालुक्यातील खंडोबाची खोपडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खोपडी येथे चंपाषष्ठी उत्सवानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची सेवा ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य ह भ प श्री संजयजी महाराज जगताप यांच्या सुश्राव्य अशा कीर्तनाने पार पडली.
 भक्ती ज्ञानाव्यतिरिक्त गोष्टीं सांगाव्यात असे किर्तन मर्यादा आहे. संताच्या घरची आणि अशाच प्रकारे कोणत्याही प्रकारचे विनोद व घरगुती गोष्टी आपल्या कीर्तनातून न सांगणारे असे अध्यात्मात नवलौकिक असलेले तसेच आपल्या कीर्तनातून ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भर देणारे अशी ह भ प श्री संजयजी महाराज जगताप यांची ख्याती आहे. 
 दिनांक 21/ 11 /2025 रोजी असलेल्या कीर्तनात त्यांनी 
देव सखा जरी
जग अवघे कृपा करी
ऐसा असुनी अनुभव 
कासाविस होती जीव
देवाची जतन 
तया बांधू ना शके न अग्न
तुका म्हणे हरी
प्रल्हादाशी यत्न करी 
या जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून सुश्राव्य अशा आपल्या किर्तनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
देव दिवाळीचे औचित्य साधून त्यांनी सांगितले की, आपली मानवाची दिवाळी नुकतीच होऊन गेली मात्र आज असलेली मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आज देव दिवाळी हा उत्सव धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून साजरा केला जातो आणि आज त्याला विशेष असे महत्त्व असून आजच्या दिवशी आपल्या गावाच्या शिवेच्या आतील जेवढेही देव असतील ते सर्व एकत्र येत असतात आणि आजच्या दिवशी त्या देवांच्या उपासनेला विशेष असे महत्त्व असते. असे त्यांनी सांगितले 
 भक्ती ज्ञानाव्यतिरिक्त गोष्टीं ना कराव्यात अशी किर्तन मर्यादा आहेत या संतांच्या घरची अशाचप्रकारे कोणतेही विनोद वा प्रांपाचीक गोष्टी न सांगता किर्तन सेवा व ब्रम्हलीन सदगुरू श्री नारायणगीरीजी महाराज यांच्या जीवनचरीत्रावर आपल्या किर्तनातून माहिती दिली. हभप श्री संजयजी महाराज यांनी सांगितले की, आपल्या राज्यात भगवान श्री खंडोबाबाच्या भक्तीला एक विशेष महत्त्व आहे आणि असे भगवान श्री खंडोबा ज्या मार्गाने गेले त्या त्या ठिकाणी त्यांचे अधिष्ठाण तयार झाले आहेत आणि जशी खंडोबाची वाकडी तशीच खंडोबाची खोपडी असे त्यांनी सांगून पुणतांबा येथेही त्यांची तलवार असलेल्याचे त्यांनी सांगितले आणि सध्या व्हायरल होत असलेला मल्हारीची वारी हा सदगुरू नारायणगीरीजी महाराज यांच्या हा व्हिडिओ हा वाकडी येथीलच असलेल्याचे त्यांनी सांगून श्री क्षेत्र खोपडी गाव म्हणजे नारायणगिरीजी महाराज यांच्या प्रेमाच्या गाव होते व त्यांच्याच प्रेरणेने व माऊली बाबांच्या आणि श्री राजेश्रगीरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेला हा यज्ञ म्हणजे त्रिवेणी संगमच असलेल्याचे त्यांनी सांगून श्री क्षेत्र खोपडी गाव हे ब्रम्हलीन सदगुरू नारायणगिरीजी महाराजांच्या विशेष प्रेमाचे गाव आणि येथे पुर्वी हरीनाम सप्ताह हा श्रावण मासात होत असे मात्र गावातील भगवान श्री खंडोबाच्या दृष्टीने हा सप्ताह चंपाषष्ठी उत्सवात व्हावा आणि अशाप्रकारे श्री नारायणगीरीजी महाराज यांच्याच दूरदृष्टीकोनातून व आशीर्वादातून चालू असलेला हा भव्य दिव्य नाम सप्ताह असलेल्याचे त्यांनी सांगून, लेणे को हरीनाम और देणे को अन्नदान आणि त्यातूनच श्री क्षेत्र खोपडी ही अन्नदानात कुठेच कमी पडत नाही .नव्हे नव्हे ते एकसे बढकर एक असा प्रसाद देण्यास अनेक दानशूर तयार असतात आणि ही सर्व सदगुरू नारायणगीरीजी महाराज यांचीच कृपा असलेल्याचे त्यांनी सांगितले. 
 भगवान शिवाचा श्री खंडोबा भगवान अनेक नावांनी ओळखला जातो आणि त्याला मार्तंड असे सुर्यदेवाचेही नाव आहेत आणि सुर्य हा आपल्याला तप्त असा प्रकाश देतो मात्र भगवान मार्तंड ही सौम्य स्वरूपाची व भक्तांची काळजी घेणारी देवता असलेल्याचे त्यांनी सांगितले. आणि अशाच खंडोबाच्या खोपडी बरोबरच ब्रम्हलीन सदगुरू नारायणगीरीजी महाराज यांचे खंडोबाच्या वाकडीला वार्षिक नियोजित किर्तने असे आणि आज व्हायरल होत असलेला मल्हारीची वारी ही मल्हारीची वारी हा त्यांच्या आवाजातील व्हिडिओ हा वाकडीचाच असलेल्याचे त्यांनी सांगून सदगुरू नारायणगिरीजी महाराज यांचा पानव येथील प्रसंग सांगताना सांगितले की पानव येथे एक गृहस्थ हा भजनी मंडळास भजन म्हणण्यास विघ्न आणत आणि एके दिवशी खुद्द सदगुरू श्री नारायणगीरीजी महाराज यांचे किर्तन असताना महाराजांनी त्या गृहस्थाला साधी आस्मान तारांची गोळी देवून त्यांच्या गळ्यात विणा दिला आणि ते चक्क वारकरी बनून विणेकरीच बनले असे सदगुरु श्री नारायणगीरीजी महाराज यांच्यात सामर्थ्य होते असे त्यांनी सांगितले.
 त्यांनी आपल्या किर्तनातून देवाला आवडत असलेल्या भक्तीवर भर देत सांगितले की या सृष्टीतील सोने नाणे अशा कोणत्याही गोष्टीची भगवंताला अपेक्षा नसते तर देवाला आपल्याकडून भक्त भक्तीचीच अपेक्षा असते असे त्यांनी सांगितले.
 १४०० वर्ष काळावर विजय मिळवणाऱ्या योगीराज श्री चांगदेव महाराजांना देखील जड भिंत चालून भक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे. हे माऊली ज्ञानेश्वर भावंडांनी सिद्ध केले आणि असे हे योगीराज श्री चांगदेव महाराज हे दररोज आकाश मार्ग श्री क्षेत्र पंढरपूरी भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी दर्शनासाठी जात असे आणि ते ते पांडूरंगाशी लीन होऊन म्हणत की मला असलेले ज्ञान म्हणजे फक्त सुईच्या टोकावर पाणी बसेल तेव्हढेच असं ते म्हणत आणि अशाच योगीराज श्री चांगदेव महाराजांचाच अवतार म्हणजे श्री गंगागीरीजी महाराज असलेल्याचे त्यांनी सांगितले. 
 जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत की, मी रामेश्वर ,काशी, सप्त तीर्थ हे सर्व तीर्थक्षेत्र करून आलो मात्र सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूरच होय. कारण येथे चंद्रभागेत दररोज दुपारी बारा वाजता जगातील सर्वच तीर्थक्षेत्राचे देव स्नानासाठी येथे हजर असतात . असे त्यांनी सांगितले. यावेळी भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments