राजुरी( वार्ताहार ) सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
श्री यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय राजुरी येथे भारताचा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राहाता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी विद्यालयामध्ये भारताचा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यातआला.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच प्रवरा सहकारी बँकेचे तज्ञ संचालक अॅड. सोपानकाका नामदेव पाटील गोरे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. नेहे मॅडम यांनी संविधानाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विविध प्रकारचे हक्क,एकत्र कुटुंब पद्धती व संस्कार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. या नंतर इ.१ ते १२ च्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून एकता वअखंडतेचा संदेश देत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधाना विषयी पोस्टर व चित्र तयार केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कल्पना नेहे मॅडम यांनी केले व आभार शेंडगे सर यांनी मानले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
0 Comments