न्यू इंग्लिश स्कूल, सावळीविहीर बु. येथे संविधान दिन उत्साहात साजरा

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

शिर्डी (राजकुमार गडकरी)- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. डहाळे मॅडम यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
यावेळी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून संविधान दिनाचे औचित्य साधले. कार्यक्रमादरम्यान शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कानडे मॅडम यांनी संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संविधान दिनानिमित्त गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीदरम्यान विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून शाळेत चित्रकला व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच इयत्ता नववीतील कु. अजित जपे आणि कु. सूरज कुंभारकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. डहाळे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री.म्हस्के ए.जे., श्री.काळेगोरे एम.बी., श्री.खान आय.आय., श्री.खेडकर बी.आर.,  श्रीमती.कानडे एम.पी., श्री.धीवर एस.एस., श्री.वाकचौरे ए.ए., श्री.लोखंडे आर.आर. तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन श्री. खेडकर बी.आर. यांनी केले.

Post a Comment

0 Comments