सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
अहिल्यानगर(प्रतिनीधी) अहिल्यानगरचे अष्टपैलु नेतृत्व भाजपा नेते लोकप्रिय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त इतर खर्चाला फाटा देऊन वृक्षारोपण करण्यात आले. अहिल्यानगर शहरातील "सिद्धीबाग" मध्ये महिला-भगिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणातुन अहिल्यानगर निरंतर हरीत रहावे ह्या संकल्पनेतुन कलमी आंब्याची लागवड करण्यात आली.
मध्यमंडळ चिटणीस सोनाली पाठक,हर्षदा पवार,हौसाबाई गोंधळे,आरती सकट,प्रिशा साळवे आदी महिला भगिनींच्या हस्ते कलमी आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले. त्या समयी मध्यमंडल अध्यक्ष सुनिल सकट,शालेय शिक्षक राहुल जाधव , माजी मध्य मंडलाध्यक्ष अशोक भोसले,संतोष सिरसाट,लखन साळवे,गौरव पाचबैल,संतोष साळवे,श्लोक पवार आदी उपस्थित होते. वृक्षारोपणाचा उपक्रम अशोक भोसले व मध्यमंडल अध्यक्ष सुनिल सकट यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. जनतेच्या मनात अधिराज्य करणारे सुजय विखे पाटील हे नेहमीच पक्ष वाढीसाठी तत्पर असतात. त्यांनी शिक्षण व आरोग्य सेवांचा विस्तार केला आहे.ते नेहमीच सामाजीक एकोप्याचे कार्य करत असतात. ते ग्रामीण भागाच्या विकासाला प्रोत्साहण देतात.त्यांच्या पुर्ण कुटूंबाने आजपर्यंत ग्रामीण भागात अभियांत्रीकी, व्यवस्थापन व महाविद्यालये स्थापण केली आहेत जि राष्ट्रिय मानव संसाधन विकासासाठी तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार करतात. त्यांनी "जनसेवा युवा मंचाच्या" माध्यमातुन जिल्ह्यात विकास व सामाजीक एकोप्यासाठी काम केले आहे. अहिल्यानगरचा विकास हेच त्यांचे स्वप्न आहे.
अशा बहुआयामी व्यक्ती समाजास दिशादर्शक असतात म्हणुनच त्यांचा जन्मदिवस वृक्षारोपण उपक्रमाने साजरा करण्यात आला असे प्रतीपादन सुनिल सकट यांनी केले.
0 Comments