प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया यांनी शिर्डीत घेतले साईदर्शन!

शिर्डी (राजकुमार गडकरी) शिर्डीच्या  श्री साईबाबांच्या दर्शनामुळे मोठी  दैवी अनुभूती व सकारात्मक ऊर्जा येते, म्हणून श्री साईंच्या दर्शनाचा मौका कायम मिळत राहावा व श्री साईबाबांचे आशीर्वाद कायम मिळत राहो, असे सुप्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया यांनी म्हटले आहे.
 प्रसिद्ध गायक ,तसेच संगीत दिग्दर्शक ,गीतकार ,चित्रपट निर्माता हिमेश रेशमिया यांनी परिवारासह शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संस्थांनच्या वतीने शाल व श्री साई मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना हिमेश रेशमिया म्हणाले की, मी शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला गेल्या अनेक वर्षापासून येतो. लहानपणीही आलो होतो. पण मला एक आवर्जून आठवतं की जगात सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय ठरलेला मायकल जॅक्सनच्या     थ्रीलर  अल्बम नंतर दुसरा असा आप का सुरूर या अल्बम ची पहिली कॉफी घेऊन शिर्डीला प्रथम साई चरणी आलो होतो व त्यानंतर बाबांच्या आशीर्वादामुळे  हा अल्बम जगात मोठा लोकप्रिय ठरला. असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगत येथील वातावरण ,लोक, अध्यात्मिक अशा दैवी शक्तीमुळे मोठी सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे येथे साई दर्शनाला येण्याचा कायम मौका मिळावा व साईंचे आशीर्वाद कायम मिळत राहावे. अशी साई चरणी प्रार्थना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हिमेश रेशमिया यांनी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणूनही काम केले असून ते इंडियन आयडल सारख्या कार्यक्रमांमध्ये जज म्हणून दिसले आहेत. आशिक बनाया आपने या गाण्यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती व त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

Post a Comment

0 Comments