तीन दिवस दारासमोर पडलेल्या गणेश माळीच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कारमृत्यूस जबाबदार असणाऱ्या एकालाही सोडणार नाही- अहिरे

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

आदिवासी भिल्ल समाजातील तरुण गणेश माळी यांच्या मृतदेहावर अखेर तीन दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
       वैजापूर तालुक्यातील डाग  येथील भिल्ल समाजातील तरुण गणेश माळी याला भरगाव वेगाने चाललेल्या वाळूच्या डंपरने चिरडले सदर घटना गुरुवार २० नोव्हेंबर रोजी घडली. एवढी गंभीर घटना घडली असतानाही पोलिसांनी प्रथम गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. तसेच आरोपी बदलून गुन्ह्याची तीव्रता कमी केली. जेव्हा सदर प्रकार   आदिवासी समाजाच्या लक्षात आला त्यावेळी भिल्ल समाजाने या प्रकाराला विरोध केला जोपर्यंत खऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही व वाहन जप्त होत नाही् तोपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे तीन दिवसापासून गणेश माळी याचा मृतदेह दारातच पडून होता. सदर घटना एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांना कळवण्यात आली त्यानंतर ज्ञानेश्वर अहिरे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य  लक्षात येताच आरोपींवर गुन्हा अटक केला व वाहन देखील जप्त केले त्यानंतर आदिवासी कार्यकर्त्यांनी प्रथम गणेश माळी याच्या पार्थिवावर तीन दिवसानंतर अंत्यसंस्कार केले व लगेच सर्व कार्यकर्त्यांनी विरगाव पोलीस स्टेशन गाठून आक्रमक भूमिका  घेतली. पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर  धरून आरोपींना अटक झाली आहे की नाही याची चौकशी केली व आरोपी तेच आहेत का याची देखील खात्री केली व पोलीस प्रशिक्षणाला लेखी निवेदन दिले त्यामध्ये वाळू वाहतुकीसाठी जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचारी, महसूलचे  अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच यावेळी एकलव्य सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे म्हणाले की गणेश माळी याच्या मृत्यूस वाळू वाहतुकीस छुपी परवानगी देणारे महसूल अधिकारी, भ्रष्ट पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत या सर्वांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे गणेश माळी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या एकालाही सोडणार नाही असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला. यावेळी राधाकृष्ण बर्डे, कृष्णा सोले, चंद्रकांत बर्डे, पुंजा हरी मोरे, मच्छिंद्र मोरे, राजेंद्र मोरे, आदी आदिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments