सत्तेचा महासंग्राम डिजिटल मिडिया
दिलीप शिंदे
सोयगाव दि. २२-- आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यातील आमखेडा जि. प. गट महिला ओबीसी राखीव ठरल्याने स्थानिक पातळीवर चांगलीच राजकीय चुरस निर्माण झाली आहे.
या गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे कै. बाबुराव काळे ग्रामीण बिगरशेती पतसंस्था सोयगावच्या माजी चेअरमन मंजुळाबाई चंद्रास आप्पा रोकडे यांची संभाव्य उमेदवारीची जोरदार चर्चा गटात सुरु आहे. मंजुळाबाई रोकडे या धार्मिक असल्याने त्यांचा भक्त परिवारासह सर्वसामान्य महिलांशी जनसंपर्क असून गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्या सातत्याने आवाज उठवत आहेत. शिवसेना (उबाठा) किसान सेनेचे तालुकाप्रमुख, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले चंद्रास आप्पा रोकडे यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे.
सोयगाव तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष, सोनसवाडी विविध कार्यकारी सोसायटी संस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. सामाजिक कार्याची ओढ असलेले रोकडे हे सार्वजनिक बांधकाम विभागात अनुरेखक पदावर कार्यरत असताना पाच वर्षे सेवा बाकी असतानाही त्यांनी राजीनामा देऊन सामाजिक कार्याला पूर्णतः वाहून घेतले.
गोर-गरीब,शेतकरी, रस्त्ये व जनतेच्या हक्कांसाठी लढताना अनेक आंदोलने, उपोषणे करून त्यांनी जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आणि त्यातून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मंजुळाबाई रोकडे या चंद्रास आप्पा रोकडे यांच्या पत्नी आहेत. चंद्रास आप्पा रोकडे यांचे मजबूत जनसंपर्क, सामाजिक कार्याची भक्कम पायाभरणी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ असल्याने त्यांच्या उमेदवारी बाबत परिसरात उत्साहाचे वातावरण गटात निर्माण झाले आहे. सोयगाव तालुक्याच्या इतिहासात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमखेडा गावातील एकाही पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी मिळालेली नाही. मंजुळाबाई रोकडे या स्थानिक असल्याने आमखेडा जि. प. गटातील निवडणूक रंगतदार होणार हे मात्र निश्चित आहे.
0 Comments