सोयगाव तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना निलंबित करा, महसूलमंत्र्यांकडे भाजपा सरचिटणीस समाधान सूर्यवंशी यांची मागणी --

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९--  सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या व अवैध रित्या गौण खनिज वाहतुकीला आळा न घालणाऱ्या तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना निलंबित करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोयगाव भाजपा सरचिटणीस समाधान सूर्यवंशी यांनी दि.०६  मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेत लेखी तक्रार केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान सोयगाव तहसीलदार या तहसील कार्यालयात नेहमीच दुपारी दोन अडीच नंतर येतात व चार पाच वाजेच्या सुमारास कार्यालयातून निघून जातात. फर्दापूर येथून कारभार बघत असल्याने तलाठी, महसूल कर्मचारी सापडेनाशे  झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची केवायसी, फार्मर आयडी साठी विलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पीकविमा मिळण्यासाठी व इतर कामासाठी तहसिल कार्यालयात चकरा माराव्या लागतात.अनेक दैनिकांमध्ये तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात बातम्या प्रकाशित झाल्या आहे.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आशीर्वादामुळे सोयगाव च्या तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड या मनमानी करीत आहे.घरकुल धारकांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार न घेता तालुक्यात अवैध रित्या गौण खनिजे व वाळूची सर्रास वाहतूक सुरू आहे यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. एक दोन कारवाई वगळता अद्यापही कारवाई केलेली नाही. अवैधरित्या गौण खनिज वाहतुकी बाबत माहिती दिली असता कारवाई केली जात नाही,तालुक्यात महसूल व पोलीस प्रशासनाचे हप्ते सुरू असल्याने कारवाई होत नाही. आपण या संदर्भात चौकशी करून तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना निलंबित करावे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा सरचिटणीस समाधान सुर्यवंशी यांनी मुबई येथे मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या मुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी यांच्या कार्यशैली वर भाजपाच्याच पदाधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित केल्याने तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



 प्रतिक्रिया -- विहीर व ठीबक असलेल्या शेतकऱ्यांना बागायतदार शेतकरी म्हणून शासनाच्या नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई मदत मिळत नसून कोरडवाहू शेतीची मदत दिली जात असल्याने शेतकऱ्यांची ही थट्टा आहे. शासनाने योग्य मदत द्यावी.

Post a Comment

0 Comments