कोणत्याही नवीन वाहनाला कधीही व कसलीही अडचण येऊ नये. हाच त्या पाठीमागचा खरा उद्देश असतो. व तो साध्य करण्यासाठी नवीन वाहने खरेदी केल्यानंतर पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. अशीच ही परंपरा जपणारे वैजापूर तालुक्यातील भऊर हे एक गाव आहे. या गावांमध्ये नेहमी हभप संजयजी महाराज जगताप, प्रमोददादा जगताप, तसेच गावचे सरपंच ,विविध संस्थांनचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. अशा या भऊर गावामध्ये गेल्या काही दिवसापासून एक नवीन प्रथा रूढ झाली आहे. कोणतेही नवीन वाहन घेतले की ते येथील प्रसिद्ध व ग्रामदैवत असणारे श्री रोकडेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर आणून तेथे या वाहनांचे विधिवत पूजन करून मग या वाहनांचा वापर सुरू केला जातो. पूर्वी ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज असताना या गावातील नागरिक नवीन वाहन खरेदी केल्यानंतर ते सरला बेट येथे नेऊन पूजन करत असत मात्र आता भऊर या गावीच श्री रोकडेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर नवीन वाहनांचे पूजन केले जाते. नुकतेच श्री रोकडेश्वर महाराजांच्या कृपेने व सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने भऊर गावचे भूमिपुत्र व रघुनाथ रामचंद्र पाटील जगताप यांचे नातू व बाळासाहेब रघुनाथ पा. जगताप यांचे जेष्ठ चिरंजीव गणेश बाळासाहेब पा. जगताप यांनी नुकतीच नवीन कार आणली.ते सध्या मागील पाच वर्षापासून आयडीएफसी बँक मध्ये मॅनेजर या पदावर काम करत आहेत.प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यावर मोठा आनंद होत असतो तसाच आनंद गणेश जगताप पाटील यांना झाला आहे. त्यांनी नुकतीच नवीन कार खरेदी केली. प्रामाणिकपणे काम करून नवीन कार घेतली व आपले स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे त्यांनी घरी आणलेली नवीन कार प्रथम प्रथे प्रमाणे श्री रोकडेश्वर महाराज मंदिरासमोर आणली. तेथे हभप संजयजी महाराज जगताप यांच्या शुभहस्ते व ॲड प्रमोद दादा जगताप आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी ,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या नवीन कारचे पूजन करण्यात आले. पेढे वाटण्यात आले. व अशी ही येथे काही दिवसापूर्वी सुरू केलेली परंपरा या माध्यमातून सुरू ठेवली . अशीच ही परंपरा कायमस्वरूपी पुढेही सुरू राहो अशी इच्छा यावेळी हभप संजयजी महाराज जगताप व अँड. प्रमोद दादा जगताप यांनी व्यक्त केली.
0 Comments