सोयगाव तालुक्यातील पिंपळा येथील राजकुंवर महाविद्यालयात संविधान दिन साजरा--



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२६-- सोयगाव तालुक्यातील पिंपळा येथील राजकुंवर महाविद्यालय महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यानंतर मुंबई येथे २६/११/ रोजी शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यातआले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नरेश कोळी यांनी केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राहुल राजपूत हे होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यानंतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले.तसेच मराठी विभाग प्रा.बि.एम.जोशी यांनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप व आभार प्रदर्शन प्राचार्य राहुल राजपूत यांनी केले,यावेळी प्रा.शुभम राजपूत, विशाल हिवाळे,अविनाश राजपूत, अनिल वाघ, किशोर राठोड, शक्ती राजपूत, इरफान शेख, झाकीर शेख आदींसह महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments