महात्मा गांधी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

लोहगाव (प्रतिनिधी): प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शाखास्तरीय गणित, विज्ञान व रांगोळी प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. 
तालुकास्तरीय गणित, विज्ञान व रांगोळी प्रदर्शनासाठी या आयोजित प्रदर्शनात विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राचार्य विनायक मेथवडे व उपप्राचार्य अलका आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शाखास्तरीय गणित, विज्ञान व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन माजी प्राचार्य मधुकर अनाप, मुख्याध्यापिका नलिनी जाधव व उपमुख्याध्यापक दिलीपराव डहाळे यांच्या हस्ते झाले.

 शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदोन्मुख तंत्रज्ञान, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन या विषयावर आयोजित केलेल्या या प्रदर्शनात सहावी ते आठवी लहान गट व नववी ते बारावी या मोठ्या गटात एकूण ६५ विद्यार्थ्यांनी आपले मॉडेल तयार करून उत्कृष्ट सादरीकरण केले. माध्यमिक विभागातील विज्ञान लहान गटात ओम काळवाघे, विज्ञान मोठ्या गटात अनंत जाधव, गणित लहान गटात सिद्धांत साळवे तर गणित मोठ्या गटात जुनेद इनामदार यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान, गणित, पर्यावरण व भौगोलिक रांगोळी स्पर्धेत गौरी नन्नावरे व पूजा वायकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केली. कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान गटात सुजल थोरात, विराज गायकवाड, आदित्य गाडेकर, तनुजा भालेराव, जिकरा तांबोळी, रोहन मोरे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून डॉ. शरद दुधाट, विठ्ठल म्हसे, विश्वास मोहिते, शिवाजी काळे, शरयू खर्डीकर, शितल राजगुरू यांनी काम पाहिले तर  प्रदर्शनाच्या आयोजनासाठी शाहिस्ता शेख, देवेश आहेर, प्रतिभा ठोकळ, प्रियंका भालेराव व निर्मला शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments