ग्रामीण भागातील राजुरी येथे बिबट्याची दहशत कायमच असून रात्रीच्या वेळी पाणी भरणे ही झाले शेतकऱ्यांना मुश्किल झाल्याचे चित्र सध्या राजुरी येथील शेतकरी बोलताना दिसत आहे.
राहाता तालुक्यातील राजुरी येथे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याची वर्दळ वाढली असून अनेक ठिकाणी बिबट्यांनी पाळीव कुत्रे,शेळ्या भेंड्या नेल्याची घटना घडलेल्या असून यावर मात्र कोणतीही उपाययोजना झाली नसल्याचे चित्र सध्या राजुरी येथे शेतकरी वर्गातून एक वेळेस मिळत आहे.राजुरी येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम केरू गोरे यांची शेती असून रात्रीच्या वेळी लाईट आल्यानंतर या शेतीमध्ये पाणी भरण्यासाठी जावे लागते.परंतु बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर या परिसरात असल्यामुळे येथे कोणीहीजाण्यासाठी तयार होत नसल्याची प्रतिक्रिया गोरे पाटील यांनी दिली असून या बिबट्यांचा बंदोबस्त वन अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होताना दिसत आहे.
तसेच मजूरही शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास तयार होत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.शेतीला लाईट येण्या जाण्याचीवेळापत्रक वेगवेगळे असल्यामुळे काही वेळेस रात्रीची लाईट येत असते.तर लाईट आल्यानंतर मोटर चालू करण्यासाठी जावे लागते.यावेळी बिबट्याची या परिसरामध्ये येणे जाणे असल्यामुळे या परिसरामध्ये कोणीही जाण्यास तयार होत नसल्यामुळे शेतीला लाईट दिवसा मिळावी अशी ही मागणी शेतकरी गोरे व नागरिकांकडून होताना सध्या दिसत आहे.सध्या लग्नसरायची धामधूम सुरू असल्यामुळे अनेक नागरिकांना बाहेरगावी ये जा करावी लागते परंतु बिबट्याची दहशत असल्यामुळे व बिबट्याचा ग्रामीण भागाकडे जास्त ओढ असल्यामुळे नागरिक आता दिवसा कार्यक्रमाला जातानाचे चित्र सध्या पहावयास मिळत असून अनेक ठिकाणी रात्रीच्या कार्यक्रमाला उपस्थिती कमी प्रमाणात पाहावयास मिळत आहे.वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ज्या भागात बिबट्याचे जास्त प्रमाणात वास्तव्य आहे अशा ठिकाणी पिंजरे लावून अशा बिबट्यांना पकडून नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत तुकाराम पाटील गोरे व्यक्त केले आहे.
0 Comments