सावळीविहिर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात शिक्षक पालक मेळावा व बालआनंद मेळावा उत्साहात संपन्न!

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

शिर्डी (राजकुमार गडकरी) राहाता तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बु या विद्यालयात गुरुवारी बाल आनंद मेळावा तसेच शिक्षक-पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मार्गदर्शक श्री.बाळासाहेब जपे पाटील यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पद्माताई कापसे,दिनेश आरणे, संजय गडकरी, रवी कापसे, सोमनाथ जाधव, मच्छिंद्र गुंजाळ, शशिकांत वाघमारे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक पालक सभेचे प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.खेडकर सर यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा, समस्यांचे निराकरण, शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले.
त्यानंतर इयत्ता दहावी वर्गाचे वर्गशिक्षक श्री.म्हस्के सर यांनी नुकत्याच झालेल्या दहावीची प्रथम सत्र परीक्षा निकाल याबाबत माहिती सांगितली. त्याचबरोबर विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.डहाळे मॅडम यांनी देखील विद्यालयातील विविध स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती सांगितली. तसेच उपस्थित पालकांच्या देखील समस्या व विद्यार्थ्यांप्रती असणाऱ्या अपेक्षा यावर चर्चा करण्यात आली. तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.कानडे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी तसेच होणाऱ्या प्रत्येक साप्ताहिक चाचण्यांविषयी पालकांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब जपे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दहावीचे वर्ष हे मुला–मुलींच्या शैक्षणिक, मानसिक आणि वैयक्तिक विकासाचा मजबूत पाया घालणारे वर्ष आहे. पुढील आयुष्याची दिशा आणि शैक्षणिक स्तर ठरवणारा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो असे सांगितले. पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच शैक्षणिक प्रगती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांवर चर्चा करून पुढील कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. शेवटी शिक्षक पालक सभेचे आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.खेडकर सर यांनी केले.
विद्यालयांमध्ये विज्ञान विषयावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‌स्पर्धेत सर्व रांगोळ्या विज्ञानाशी संबंधित संकल्पनांवर आधारित तयार करण्यात आल्या.
यानंतर बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात लहान मुलांनी उत्साहाने विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. यात चायनीज पदार्थ, फळे, वडापाव, पाणीपुरी, साबुदाणा वडा, गुलाबजामून, पोहे तसेच अनेक विविध प्रकारचे स्टॉल्स होते. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्पादनांची विक्री अगदी बाजाराप्रमाणे आत्मविश्वासाने केली. या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळाला तसेच व्यवहारज्ञान, पैशाचे व्यवस्थापन आणि संवाद कौशल्ये यांचे समज दृढ झाले. या कार्यक्रमाला पालकांनीही मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. डहाळे मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. म्हस्के सर, श्री. काळेगोरे सर, श्री. खान सर, श्री. खेडकर सर, सौ. कानडे मॅडम, श्री. धीवर सर, श्री. वाकचौरे सर, श्री. लोखंडे सर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments