नाशिक पाटबंधारे विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू

नाशिक पाटबंधारे विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू  राहाता येथील प्रशासकीय इमारत समोर  सुरू नाशिक पाटबंधारे विभाग यांच्या अंतर्गत येणारे गोदावरी नूतनीकरण उपविभाग चे उपअभियंता तुषार खैरनार यांनी केलेल्या थातूरमातूर कामाच्या संदर्भात गणीभाई शेख छावा ब्रिगेड चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे रेवणनाथ खाडे यांचे उपोषण सुरू झाले असून गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांना निवेदन दिलेले होते परंतु अद्यापही त्यांच्याकडून कुठलेही कारवाईचे पत्र काढण्यात आलेले नाही व कार्यवाही केलेली नाही या संदर्भात वारंवार तक्रारी करून ही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही संबधित अधिकारी ठेकेदार यांना पाठीशी घालित आहे.
उपविभागाच्या अंतर्गत झालेल्या मोरी कामाची, वॉटरकोस,सिव्हिल कामे कमी सिमेंट वापरून मातीमिश्रित सिमेंट वापरून शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे म्हणून या सर्व कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी तसेच ठेकेदार यांच्यावर कडक कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद केलेले आहे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असा पावित्रा संबंधित उपोषण कर्ते यांनी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments