बांधकाम कामगाराचा मुलगा झाला सी ए

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)


टाकळीभान प्रतिनिधी-श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे सदस्य  कैलास रोकडे एक बांधकाम कामगार अतिशय गरीब परिस्थितीतून आपल्या मुलाला शिकवून त्याने आत्ताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून बांधकाम कामगाराचा मुलगा ओंकार कैलास रोकडे सीए झाला ,  
       कैलासच्या आई वडील यांनी मोल मजोरी करून ओंकार ला शिक्षण दिले त्यांनी देखील आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवले ओंकार हा वि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्‍स ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्यावतीने सप्टेंबर महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत 22 व्या वर्षी सीए परीक्षेत उत्तीर्ण झाला ,
    त्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल त्यांचा भोकर येथे वडील कैलास रोकडे व चिरंजीव ओंकार रोकडे यांचा स्व ऋषी छल्लारे फाउंडेशन भोकर व श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने ,संस्थापक गणेश भाऊ छल्लारे सचिव प्रताप लोखंडे, प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे व  हरिभाऊ बिडवे ,सहसचिव दादासाहेब जाधव ,बाजार समितीचे संचालक मयूर पटारे तसेच भोकर सोसायटीचे  चेअरमन महेश पटारे यांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला,
यावेळी श्रीराम संघटित बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक गणेश चिल्लारे यांनी सांगितले की आपले जे बांधकाम कामगार आहेत ,त्यांचे मुलं उच्चशिक्षित शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी आपण कामगार मंडळाकडून जी शिष्यवृत्ती मिळत आहे, किंवा कामगारांसाठी जी महामंडळाकडून सुविधा दिली जाते ,ती सर्व सुख सुविधा आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून देऊ व कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे संघटना उभे आहे, असे मनोगत व्यक्त केले .
   यावेळी ,सोसायटी चे संचालक बाळासाहेब विधाटे ,कारभारी  तागड, नानासाहेब जगदाळे, सागर शिंदे ,बाबासाहेब तागड , सुरेश राहीन्ज यांच्या उपस्थिती होते,

Post a Comment

0 Comments