शिर्डी ( प्रतिनिधी)-
संतश्रेष्ठ रविदास महाराज यांना संत मीराबाई यांनी गुरू मानले होते तसेच संत कबीर त्यांच्या समवेत अनेक दोह्यांमधून समाज प्रबोधनाचे रविदासांनी कार्य विशद केले आहे अशा थोर संतांचे विचार तळागाळातील समाज बांधवांसह पर्यंत पोहोचले पाहिजे या हेतूने अहिल्यानगर मध्ये संत रविदासांचे स्मृती स्मारक उभारले असून समाज बांधवांसाठी प्रेरणादायी वास्तु असेल असे प्रतिपादन चर्मकार विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर यांनी केले.
संत रविदास महाराज यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून अहिल्यानगर येथील संत रविदास महाराज विकास केंद्रच्या नविन वास्तूचे समाज बांधवांच्या हस्ते श्रीफळ वाढून पूजन करण्यात आले
. विकास केंद्राचे मार्गदर्शक आमदार संग्रामभैया जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. सल्लागार संपतदादा बारस्कर व डॉ.सागर बोरुडे यांचे विशेष सहकार्य लाभले असून विकास केंद्राच्या इमारतीमध्ये संत रविदास महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
समाजसेवक दीपक धस केडगाव यांनी संत रविदास विकास केंद्रास पाच हजार रुपये देणगी दिली.
यावेळी सुभाष सोनवणे, दिनेश देवरे बाळासाहेब कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संपत नन्नवरे, दीपक धस, दिलीप बोरखे, भाऊसाहेब आंबेडकर, सुरेश शेवाळे, मारुती एडके, देवराम तुपे, अमोल डोळस, दिलीप कांबळे, भानुदास नन्नवरे, भिकाजी वाघ, बाळू केदार, महेश काजळकर ,मनीष कांबळे ,भारत चिंधे, संदीप सोनवणे, स्वप्नील खामकर, माणिक लव्हाळे, विनोद कांबळे, रुपेश लोखंडे आदिंसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष गटई आघाडी माणीक लव्हाळे तर शहराध्यक्ष गटई आघाडी दिलीप बोडखे त्यांची नियुक्ती करून यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलताना खामकर म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संत रविदास महाराजांचे स्मृतिस्थळ गरजेचे होते त्या दृष्टीने प्रयत्न करताना अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाने व संपतदादा बारस्कर तसेच डॉ.सागर बोरुडे यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य स्मारक उभे राहिले आहे या स्मारकातून सर्व समाज बांधवांना प्रेरणा मिळेल व यातून समाजाची उन्नती व सर्वांगीण विकास होणार आहे यावेळी संजय खामकर यांनी सांगितले.
आपल्या भाषणातून कविवर्य सुभाष सोनवणे म्हणाले की, संत रविदास यांचे विचार संपूर्ण जगाने मान्य केले आहेत समाज बांधवांमध्ये मात्र या विचारांविषयी व त्यांच्या कार्याविषयी जागरूकता आणणे गरजेचे आहे संत रविदास महाराजांच्या कार्याची ओळख नवीन पिढीला यासाठी संत रविदास महाराज विकास केंद्र कायम प्रेरणा देणारे असेल असे यावेळी सोनवणे म्हणाले यावेळी शाहीर अरुण, आहेर,संतोष कांबळे, निलेश आंबेडकर व रामदास निर्वाण यांचे दुःखद निधन झाल्याने सर्वांच्या वतीने या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे राजेंद्र धस सर यांनी आभार मानले.
0 Comments