टाकळीभान ग्रामपंचायत दहा सदस्यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केले अपात्र करण्याची सुनावणीची नोटीस

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

टाकळीभान - प्रतिनिधी - : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचातच्या दहा सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले असल्याने, त्यांचे सदस्यपद अपात्र करण्यात यावे, याबाबतचा वाद विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कोर्टात सुरू होता. सुमारे तीन वर्षे याबाबतचा अंतिम निकाल प्रलंबित असल्याने अप्पर विभागीय आयुक्तांनी या दहा सदस्यांना सुनावणीची नोटीस जारी केली आहे.
              टाकळीभान ग्रामपंचायतीच्या २०२० च्या निवडणुकीत निवडून आलेले दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केलेले असल्याने ते सदस्य पदावर राहण्यास अपात्र आहेत, याबाबतचा विवाद अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात ज्येष्ठ शिवसेना नेते राधाकष्ण वाघुले यांनी दाखल केला होता. वेळोवेळी सुनावणी होऊन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या दहा सदस्यांना सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरवले होते. याबाबत त्या दहा सदस्यांनी विभागीय आयुक्त. नाशिक
यांच्या कोर्टात अपिल दाखल केले होते. याबाबत वेळोवेळी सुनावणी होऊन उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर निर्णयाकामी गेली तीन वर्षे हे प्रकरण निर्णयाकामी प्रलंबित होते. मात्र, तत्कालीन विभागीय अपर आयुक्त यांची पदोन्नतीवर बदली झाल्याने सदर प्रकरणात निर्णय पारीत करण्यात आला नव्हता. त्यामुळे नव्याने रुजू झालेले विभागीय अपर आयुक्त यांनी याप्रकरणी ११ डिसेंबर रोजी त्यांच्या दालनात सुनावणी ठेवली आहे. सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस त्या दहा सदस्यांना देण्यात आली असून, वकिलामार्फत लेखी म्हणणे देण्याचे सुचित करण्यात आले आहे.
निवडणूक पार पडल्यावर काही दिवसांतच जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्य अपात्रतेबाबत विवाद अर्ज दाखल करण्यात आला होता. २०२२ ला जिल्हाधिकारी यांनी दहा सदस्यांना सदस्य पदावर राहण्यासाठी अपात्र केले होते. मात्र, अपर विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयातून दिलासा मिळण्यासाठी अपील दाखल केले होते.

Post a Comment

0 Comments