टाकळीभान प्रतिनिधी : अखिल लोहार समाज विकास संघ व लोहार समाजातील समविचारी संस्था यांच्या विद्यमाने शहरातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात ११ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय लोहार समाज वधू वर परिचय मेळावा भव्य दिव्य करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन समितीची सभा नुकतीच झाली. यावेळीअध्यक्षस्थानी भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ हारेर हे होते. बैठकीला संदीप थोरात, हर्षल आगळे, नवनाथ हराळे, प्रभाकर लाड, बाळासाहेब इघे, अमोल जवणे, विनायक गाडेकर, सुधाकर कौसे, अशोक पवार, अशोक हराळे, जालिंदर पोपळघट, निवृत्ती पोपळघट, गणेश भालके, विजय म्हस्के, प्रदीप पोपळघट आदी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव व समाजातील उपवर वधू उपस्थित राहतील, यासाठी समाजामध्ये माहिती पोहोचवण्याचे ठरले, तसेच, समाजातील उपवर वधूंची माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित करण्याचेही ठरले. मेळाव्यास व्यापक प्रतिसाद मिळावा, यासाठी काही पदाधिकाऱ्यांचे तालुकानिहाय दौरे करण्यात येणार आहेत. याशिवाय पॅम्प्लेट, फ्लेक्स आदींद्वारे ही मेळाव्याचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले. नवनाथ हराळे यांनी प्रास्ताविक केले.
0 Comments