सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
टाकळीभान प्रतिनिधी : ३-ए साइड फेडरेशन ऑफ इंडिया आणि सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २री अंडर-१७ मुले व मुली राष्ट्रीय ३-ए साइड व्हॉलीबॉल स्पर्धेचे आज सकाळी भव्य उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले.
देशातील ११ राज्यांतील मुलांचे आणि ४ राज्यांतील मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाल्याने कोपरगावात राष्ट्रीय क्रीडा जल्लोष सुरु झाला आहे.श्री.सुहास गोडगे, शारदा शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, तसेच फेडरेशनचे वरिष्ठ पदाधिकारी वी. एस. ए. राजू, मारुती हजारे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेला भव्य सुरुवात मिळाली.याचबरोबर विविध राज्यांच्या संघटनांचे सचिव देखील उपस्थित होते. यामध्ये गुजरातचे डॉ. सुजित चव्हाण, छत्तीसगडचे ओमप्रकाश सिंह, कर्नाटकचे एम. आर. सिद्धार्थ, तेलंगणाचे एल. रोशन, मध्य प्रदेशचे मुनिलाल चौरसिया, दिव्यांचे निलेश एन., आंध्र प्रदेशचे जी. मुरली, महाराष्ट्रचे नितीन बलराज आणि उत्तर प्रदेशचे रविंद्र सिंह यांचा समावेश होता.
पहिल्या दिवशी तेलंगणा,उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची दमदार सलामी..
उद्घाटनानंतर सुरू झालेल्या गट पातळीवरील सामन्यांमध्ये तेलंगाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र संघांनी अप्रतिम खेळ करत विजयाची नोंद केली.वेगवान सर्विस, अचूक स्पाईक आणि उत्कृष्ट बचावामुळे प्रेक्षकांनी खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.मुलांच्या गटात महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, जम्मू–कश्मीर, पंजाब आणि दिल्ली असे अकरा राज्यांचे संघ मैदानात उतरले आहेत. मुलींच्या गटात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा हे चार संघ असल्याने चुरस अधिक रंगतदार होणार आहे.
कोपरगावात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील रोमांच...
0 Comments