सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
शिर्डी(राजकुमारगडकरी)-साई पूजा रिक्षा युनियन चालकांनी ड्रेस कोड ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीचे कागदपत्र त्याचप्रमाणे शिस्तीचे पालन करून साई भक्तांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी व साई भक्तांना साईबाबांविषयी योग्य प्रकारे माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक रमेश गोंदकर यांनी केले आहे.
नुकताच साई पूजा रिक्षा संघटनेच्या वतीने सर्वांना दिवाळीनिमित्त गृह उपयोगी वस्तू किराणा किट व मिठाईचे भेटवस्तू वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आप्पासाहेब कोते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर संघटनेचे संस्थापक राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ गोंदकर यांचे हस्ते वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विमा सुरक्षा कवच विमा पॉलिसी करण्यास असल्याचे रमेश गोंदकर यांनी सांगितले की, साई पूजा रिक्षा युनियन चालकांनी ड्रेस कोड ड्रायव्हिंग, लायसन्स गाडीचे कागदपत्र त्याचप्रमाणे शिस्तीचे पालन करून साई भक्तांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी. देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तांना साईबाबा विषयी योग्य प्रकारे माहिती द्यावी. साई भक्तांना शहरातील सर्व सोयी सुविधांचे योग्य मार्गदर्शन करावे. असे शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक रमेश गोंदकर यांनी यावेळी म्हटले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कानडे यांनी केले .याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश कांबळे, रहीम पठाण , संतोष ठाकूर, अन्सार शेख, नितीन गायकवाड ,सुभाष राक्षे ,शरद़ मंडलिक , रिक्षा चालक व मालक संघटनेचे रहीम पठाण. वसीम शेख.संतोष ठाकूर. नितीन गायकवाड. सुभाष राक्षे उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार वसीम शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते.
0 Comments