आहे त्या ठिकाणी बस स्टॅन्ड बांधण्यात यावे यासाठी बस स्टँडच्या ठिकाणी मल्हार रणनवरे यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू,



टाकळीभान: प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील बस स्टँडच्या जागेत अतिक्रमण झाले असून आहे त्या ठिकाणी बस स्टॅन्ड बांधण्यात यावे या मागणी करता येथील कार्यकर्ते मल्हार रणनवरे यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे.

             निवेदनात त्यांनी म्हटले आहे की श्रीरामपूर राज्य मार्ग क्रमांक ५० हा रस्ता आमच्या टाकळीभान गावातून जातो. स्टॅन्ड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत प्रवाशांच्या सोयीसाठी व स्थानक अस्तित्वात होते. परंतु सदर रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना बस स्थानक कुठल्याही प्रकारे अडथळा न ठरता ही, त्याचा विनाकारण पाडाव करण्यात आला. व या बस स्टँडच्या जागेत मोठा राजकीय वरदस्त असलेल्या व्यक्तीने या  स्थानकाच्या जागेत गाड्यांचे अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे. सदर प्रकरणामुळे गावातील प्रवासी विद्यार्थी व माता-भगिनी यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळा पावसाळा रात्रंदिवस बस स्थानक नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. 
म्हणून आपण तात्काळ टाकळीभान येथे पूर्वीप्रमाणे बस स्थानक उभारून द्यावे तसेच अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करावी व केलेल्या कृत्यास अधिकाऱ्याला चौकशी करून त्यावर ही योग्य ती कारवाई करावी या आशयाचे निवेदन राजेंद्र उर्फ मल्हार संजय रणवरे यांने दिले आहे. या निवेदनाच्या प्रती तालुक्याचे आ. हेमंत ओगले, तहसीलदार श्रीरामपूर, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांना देण्यात आल्या आहे.
            या उपोषणासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय रणनवरे, बाजार समितीचे संचालक तथा ग्रा. सदस्य  मयूर पटारे, कारेगाव भागाचे संचालक शिवाजीराव शिंदे, दादासाहेब कापसे, भाऊसाहेब पटारे , काकासाहेब कोकणे,संजय पटारे, बद्रीनाथ पटारे सर, मच्छिंद्र कोकणे, सचिन माने, विकास पटारे,गोरक्षनाथ कोकणे, विठ्ठल जाधव, मनोज पवार, दत्तू म्हस्के दत्तू नाईक, सुनील बोडकेआदींनी पाठिंबा दर्शविला आहे.

Post a Comment

0 Comments