टाकळी भान प्रतिनिधी: ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या उद्योगांना आधार देत सहकार चळवळीत आदर्शदायी काम करून ठेवीदारांचा विश्वास संपादन करत दोनशे कोटींकडे वाटचाल करण्याचे काम साई आदर्श मल्टिस्टेटच्या माध्यमातून सुरू असल्याचे प्रतिपादन डॉ. बा.बा. तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी केले आहे. साई आदर्श मल्टिस्टेटच्या वतीने मुख्य सभागृहात दीपावली निमित्ताने शनिवारी सभासदांना लाभांश आणि कर्मचाऱ्यांना बोनस वाटप कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांनी सर्वांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी केले. या वेळी व्यासपीठावर प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे आणि माध्यमिक
शिक्षक सोसायटीचे संचालक संभाजी गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुण तनपुरे म्हणाले की, कुठलीही संस्था चालवण्यासाठी संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचे योग्य पाठबळ आवश्यक असते, आणि ते साई आदर्शच्या संचालक व कर्मचाऱ्यांमधून स्पष्ट दिसून येते. साई आदर्श मल्टिस्टेट योग्य पद्धतीने कारभार करत असल्याने संस्थेने सर्वत्र नावलौकिक मिळविला आहे. आप्पासाहेब शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले की, साई आदर्श मल्टिस्टेटने संस्थेच्या हिताबरोबर सामाजिक
बांधिलकीही जोपासली आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी व खेळाडूंना मदत देण्याचे कार्य संस्थेने सातत्याने केले आहे.कार्यक्रमास प्रशांत वाबळे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन, वैभव गिरमे, माजी नगरसेवक प्रदीप गरड, येस बँकेचे व्यवस्थापक स्वानंद ब्राह्मणे, बाळासाहेब तांबे, धीरज कपाळे, अक्षय कपाळे, प्रकाश सोनी, पारस नहार, बाळासाहेब भालेराव, चांगदेव पवळे, रंगनाथ घाडगे, पुंजाभाऊ गांडूळे, भास्कर कोळसे, दत्तात्रय साळुंके, हर्षदताथेड, नितीन डमाळे, अतुल त्रिभुवन, डॉ. बोरुडे, रामेश्वर तोडमल, सुनील संचेती, पोपट भंडारी, राजू शेख, राजू साळुंके, सर्जेराव शेटे, साई त्रिभुवन, सोनू आहेर, ऋषभ संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन पत्रकार गणेश विधे यांनी केले, तर आभार अविनाश साबरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य व्यवस्थापक सचिन खडके, वसुली अधिकारी याकुब शेख, गोपीनाथ हारगुडे, विक्रम जाधव यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments