टाकळीभानच्या विठ्ठल रूख्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने अपत्ती ग्रस्तांसाठी एक लाखाची मदत.

टाकळीभान प्रतिनिधी :-श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने अपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी एक
लाख रूपयांचा धनादेश श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते सुपुर्त करण्यात आला.

         राज्यात झालेल्या अतीवृष्टीने शेतकर्‍यांचे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून अतीवृष्टीने ओढे, नाले, नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी जनावरे वाहुन गेले आहेत शेतकरी व नागरिकांच्या घरादाराचेही मोठे नुकसान झालेले असून या अपत्तीग्रस्तांना मदत म्हणून देवस्थानच्या वतीने एक लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाकडे प्रांताधिकारी यांचेमार्फत सुपूर्त करण्यात आला आहे.
           यावेळी बोलतांना प्राताधिकारी किरण सावंत म्हणाले की, येथील देवस्थानने अपत्ती ग्रस्तांसाठी मदत देण्याचा चांगला निर्णय घेतला असून त्यांचा आदर्श घेवून इतर देवस्थान व संस्थांनी अपत्ती ग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करून त्यांनी येथील देवस्थानने दिलेल्या मदती बद्दल विश्वस्तांना धन्यवाद दिले.
             यावेळी द्वारकानाथ भालसिंग, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे, रावसाहेब मगर, मुंजाळ, टाकळीभान बिग बागायतदार सेवा संस्थेचे अध्यक्ष दिपक डुकरे, पत्रकार विजय देवळालकर, बापूसाहेब नवले, बापूसाहेब पठारे,नाना लेलकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments