लोहगाव ( वार्ताहर )
अमित शहा (केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री ) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण व कारखाना विस्तारित प्रकल्पाचा नूतनीकरण शुभारंभ करण्यात आला असून त्यांच्या स्वागतासाठी भाजप चे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब पाटील चेचरे. सरपंच शशिकांत पठारे,उपसरपंच अशोक चेचरे, ग्रामपंचायत सदस्य व शांताराम चेचरे तंटामुक्ती अध्यक्ष. माजी उपसरपंच दौलत चेचरे, सुरेश चेचरे , शुभम चेचरे,व आजी व माजी पदाधिकारी व लोहगाव ग्रामस्थां स्वागतासाठी उपस्थित होते यावेळी सर्व गावात रांगोळी काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला येथील गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे अतिशय सुंदर असं रांगोळीचं नियोजन करण्यात आलं होते सर्वत्र आनंदाचा व जल्लोषाचा माहोल तयार झाला होता यावेळी प्रियंका पठारे, मनीषा बंग,साक्षी दिवे, दिव्या मंडलिक, साक्षी खरात, साक्षी सोनवणे, आरती कदम, रितू ठोंबरे, रिंकू घुले, मानसी रोकडे, कावेरी पगारे, समीक्षा सोनवणे अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे अनमोल सहकार्य लाभले.
0 Comments