सभासदांना दिवाळीनिमित्त साखर वाटप

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

टाकळीभान प्रतिनिधी-  टाकळीभान येथील श्री संत सावता माळी वि.का. सह. सोसायटीने संस्थेच्या सर्व सभासदांनी दिवाळी निमित्त साखर वाटप करुन सभासदांची दिवाळी गोड केली आहे. 
             टाकळीभान   येथील शेतकरी सभासदांच्या विश्वासास पाञ ठरलेल्या श्री संत सावता माळी वि.वि.कार्य. सह. सोसायटीकडुन स्थापनेपासुन सभासदाभिमुख कामातुन वेगळा ठसा निर्माण केला आहे. संस्था स्थापने पासुन अखंडपणे  कर्जाचा वसुल शंभर टक्के करुन उत्तम प्रकारे प्रगती करीत आहे. स्व. माजी आमदार जयंतराव ससाने, स्व. भाऊसाहेब दाभाडे व स्व. एकनाथ लोखंडे यांनी तयार केलेल्या  मार्गदर्शक तत्वानुसार संस्थेचे कामकाज सुरु आहे. जिल्हा सह. बँकेचे संचालक करण ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगती पथावर आहे. संस्थेच्या वतीने सभासद हिताचे निर्णय वेळोवेळी घेतले जात आसल्याने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. यंदाची दुष्काळी परीस्थिती व कर्जमाफिचे वारे जोरात वहात आसतानाही सभासदांनी संस्थेचे हीत डोळ्यासमोर ठेवुन व्यवस्थापक मंडळाला सहकार्य करीत शंभर टक्के कर्जाचा वसुल दिला होता. त्यामुळेच सभासदांची दिवाळी गोड व्हावी यासाठी व्यवस्थापक मंडळाने निर्णय घेवुन प्रत्येक सभासदाला पंधरा किलो साखर मोफत वाटप केली आहे.
           यावेळी टाकळीभान सोसायटीचे चेअरमन तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते मंजाबापु थोरात, ज्येष्ठ नेते विलास दाभाडे,जिल्हा सह. बँकेचे शाखाधिकारी पृराग ढुमने,  संत सावताचे व्हा. चेअरमन शिवाजी शिरसाठ, जेष्ठ संचालक बाबासाहेब बनकर, चंद्रकांत लांडगे, प्रकाश दाभाडे, रावसाहेब गायकवाड, रघुनाथ लोखंडे, रामकृष्ण गायकवाड, तुकाराम बोडखे, मोहन रणनवरे, आबासाहेब ढुस, गजानन कोकणे, किशोर दाभाडे, नानासाहेब रणनवरे, इंद्रभान दाभाडे, सचिव रामनाथ ब्राम्हणे, विठ्ठल बनकर, रविंद्र शिरसाठ, आदींसह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
Hide quoted text

चौकट ----------
--------------------------- 
    पञकारांचीही दिवाळी केली गोड
यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे वेळोवेळी सुयोग्य वार्तांकन करणाऱ्या स्थानिक पञकारांचाही संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा आसल्याने संस्थेच्या वतीने सर्व पञकारांनाही सभासदांप्रमाणे साखर वाटप करुन पञकारांचीही दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्व पञकारांनाही सन्मानपुर्वक साखरेचे वाटप केले. प्रथमच पञकारांनाही सभासदांचा दर्जा देण्यात आल्याने उपस्थित सर्व पञकार काही वेळ भाऊक झाले होते.

Post a Comment

0 Comments