मधुकर अनाप यांच्याकडून वृक्षभेट



लोहगाव (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्ताने महात्मा गांधी संकुलाचे माजी प्राचार्य मधुकर अनाप यांनी संकुलासाठी ५० नारळ वृक्ष आणि इतर शोची ५० वृक्ष भेट दिली आहेत. महात्मा गांधी संकुलात नुकतेच कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुकर अनाप यांनी वृक्षांसाठी देणगीची रक्कम प्राचार्य विनायक मेथवडे यांच्याकडे सुपूर्द केली.

 तर कन्या विभागासाठी पाच हजार रुपये देणगी मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी प्रमुख पाहुणे सचिव विकास देशमुख, अध्यक्ष रावसाहेब म्हस्के पाटील, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे, सुधीर म्हस्के, रमेश शिंदे, प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. विवेक मुरूमकर, प्रसिद्ध उद्योजक समीर घाडगे, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र कापसे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments