लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे रविवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता जिल्ह्यात अनेक पुरस्कार विजेत्या शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टीचा गोंधळाचा कार्यक्रम जगदंबा माता तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. राहता तालुक्यातील हनुमंतगाव मध्येही जगदंबा माता तरुण मित्र मंडळाच्या वतीने देवीची मूर्ती स्थापन करून रोज अतिशय भक्तिमय वातावरणात देवीची मनोभावे पूजा अर्चा करून देवीची भक्ती केली जात आहे. त्यानंतर रोज संध्याकाळी साबुदाणा खिचडी, फळे, तसेच फराळाचे नियोजन करून आरतीसाठी उपस्थित असलेल्या भाविकांना फराळ दिले जाते. या ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय असते रोज नित्य नियमाने महिला आरतीला उपस्थित असतात. तसेच अतिशय शांततेच्या मार्गाने सर्व महिला उपवासाच्या फराळाचा आनंद या ठिकाणी घेतात. रविवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता जगदंबा तरुण मित्र मंडळाने जिल्ह्यात अनेक पुरस्कार पटकावलेल्या शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टीला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. या पार्टीने जिल्ह्यात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तसेच जिल्ह्यातील जागरण गोंधळ पार्टींच्या स्पर्धेत या शिव मल्हार पार्टीने प्रथम क्रमांक मिळावला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय रंगतदार होणार आहे. तरी हनुमंतगावातील भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे अवाहन जगदंबा माता तरुण मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments