लोणी( वार्ताहर)
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण आरक्षणाबाबत माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तथा पालकमंत्री अहिल्यानगर,
यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले त्या निवेदनामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या आरक्षणासंदर्भात शासनाने निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांची समिती नियुक्त केली होती.
त्या समितीची 14 सप्टेंबर 2025 रोजी मुदत संपली असून समितीचा अहवाल घेऊन कार्यवाही होणे आवश्यक असताना पुन्हा बदर समितीला मुदतवाढ दिली आहे हे अत्यंत चुकीचे असून मुदतवाढ रद्द करावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर शासनाने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी आणि शासनाने मेघा भरती करण्याचे धोरण जाहीर केल्याने त्याचा मातंग समाजावर 100% अन्याय होणार आहे तेव्हा शासनाने त्वरित बदर समितीला दिलेली मुदतवाढ बाबतचा जी आर रद्द करून अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचे आरक्षण जाहीर करावे त्याचप्रमाणे एक ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाच्या बाबत जो निकाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.समितीला एक वर्ष पुर्ण झाले असून अद्यापही अहवाल दिला नाही इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यात उपवर्गीकरणाचे आरक्षण लागु झाले आहे.
पाच ते सहा राज्यांमध्ये अनुसूचित जातीचा उपवर्गीकरणाचे आरक्षण दोन ते तीन महिन्यात आदेश लागू झाले आहेत त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील अंमलबजावणी करणे अभिप्रेत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने मोर्च धरणे सध्या होत आहेत तेव्हा शासनाने न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल स्वीकारून उपवर्गीकरणाचा आदेश जाहीर करावा व समितीला दिलेली मुदतवाढ त्वरित मागे घ्यावी अशी सकल मातंग समाज अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने विनंती करत आहोत या निवेदनाच्या प्रती माननीय जिल्हा अधिकारी साहेब अहिल्यानगर माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे देण्यात आल्या आहेत प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घेऊन शासकीय दरबारी या निवेदनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या भावना माननीय मुख्यमंत्री व प्रशासनाला द्याव्यात अशी विनंती करण्यात येत आहे.
हे निवेदन देताना प्रा. डॉ. भाऊसाहेब पवार, राजेंद्र त्रिभुवन, इंजिनियर सुरेश जगधने, लहानु शेठ खरात, सुनील बोरुडे, संभाजी बलसाने, प्रकाश जगधने, नगरसेवक जालिंदर आरणे, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, संजय शिंदे सर, विश्वनाथ आल्हाट सर, ताराचंद भडकवाड, चंद्रकांत कांबळे, हे उपस्थित होते निवेदनावर माधवराव वाकोळे, प्रा. रघुनाथ खरात, बाळासाहेब बोरुडे, विजय बोरुडे, जगन्नाथ पेटारे, आप्पासाहेब शेलार, अमोल बोरुडे, अविनाश पवार, प्रकाश सरोदे, अशोक ससाणे, मच्छिंद्र आरणे, रामनाथ खरात, राहुल पोळ, अजय आरणे, अनिल आरणे, बाळासाहेब पवार, काळुराम बोरुडे, विजय बोरुडे, बाबासाहेब जगधने, भास्कर बोरुडे, योगेश बोरुडे, दिलीप बोरुडे, विलास बोरुडे, यांच्या सह्या आहेत.
0 Comments