जनसेवा फाउंडेशनच्या वतीने डॉ. धनश्री विखे यांच्या हस्ते टाकळीभान जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना टिफिन डब्याचे वाटप,
टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यामध्ये सक्षम नेतृत्व राहिले नसल्याने डॉ. धनश्री विखे यांनी श्रीरामपूरच्या विकासाकरता श्रीरामपूर तालुक्याचे नेतृत्व करावे असे उद्गार मा. सभापती नानासाहेब पवार यांनी काढले. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीभानच्या सर्व शाळांना टिफिन डबे वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून रणरागिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. धनश्री विखे उपस्थित होत्या. व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मंगलताई थोरात होत्या.
यावेळी व्यासपीठावर डॉ. स्वाती चव्हाण,भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, मार्केट कमिटीचे संचालक गिरीधर आसने, अशोकचे माजी संचालक भाऊ थोरात,अशोकचे मा. व्हा. चेअरमन पोपटराव जाधव, भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ. शंकरराव मुठे, मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे, महेंद्र पटारे,राजेंद्र पवार, कैलास पवार ,चित्रसेन रणनवरे, बंडोपंत पटारे,शिवाजी धुमाळ, रोहिदास पटारे, शिक्षण विस्तार अधिकारी दरंदले, केंद्रप्रमुख जाधव मॅडम आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना नानासाहेब पवार म्हणाले की टाकळीभान गाव हे विखे कुटुंबियांचे लाडके गाव असून या गावांमध्ये विविध विकास कामांसाठी स्व.खा. बाळासाहेब विखे पा. ना. राधाकृष्ण विखे पा. मा. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी मदत व सहकार्य केल्याचे सांगितले.विखे कुटुंबाच्या संकल्पनेतूनच टाकळीभान ग्राम सचिवालय, सांस्कृतिक भवन, टाकळीभान नेवासा रोड वरील विठ्ठल रुक्मिणी कॉम्प्लेक्स व्यापारी संकुल, टाकळीभान वांगी रोड, गावामध्ये नवीन डीप्या अशी विविध कामे झाले आहेत. तसेच टाकळीभान कृषी उत्पन्न उपबाजार आवार समितीच्या उभारणीसाठी विखे कुटुंबाचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. डॉ. धनश्री विखे यांनी बचत गटामार्फत महिलांचे मोठे संघटन व सक्षमीकरण केले असून त्या चांगले काम करू शकतात. त्यामुळे त्यांना श्रीरामपूर मध्ये मोठी संधी असून श्रीरामपूरच्या विकासासाठी डॉ. धनश्री विखे यांनी नेतृत्व करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
म्हणाल्या की मुलांचे पालन पोषण व्यवस्थित व्हावे यासाठी छोटीशी भेट म्हणून जन फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आई वडील गुरूंचा सन्मान करून चांगले संस्कार अंगीकारावे व जीवनात मोठे यश मिळवावे अशा शुभेच्छा दिल्या. व श्रीरामपूर तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळावे या उद्देशाने टाकळीभान जिल्हा परिषद शाळेसाठी चार डिजिटल एलईडी संच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून देण्याचे त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच कान्हा खंडागळे, मा. चेअरमन राहुल पटारे, युवक नेते भाऊसाहेब पवार,भाजपचे तालुका उपाध्यक्ष मुकुंद हापसे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष अनिल दाभाडे,, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, ग्रामसेवक भिंगारदे, भोकरचे सरपंच काकासाहेब पटारे, सुधीर मगर, आप्पासाहेब रणनवरे, सतीश आभाळे, गोल्हार,विलास सपकळ, अर्जुन भालेराव, बबलू बनकर, केशव रणनवरे, मुख्याध्यापक क्षीरसागर, अनिल गायकवाड, योगिता अवचट, आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा सेविका, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका,पालक ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments