शिर्डी (राजकुमार गडकरी) राहता तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, सावळीविहीर विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत थेट फायनल पर्यंत मजल मारत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सतरावर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत शाळेचा पहिला सामना शृंगेश्वर विद्यालय, शिंगवे यांच्याशी झाला. या सामन्यात सहा गुणांची आघाडी घेत न्यू इंग्लिश स्कूलने पुढील फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या सामन्यात गणेश विद्यालय, गणेशनगर विरुद्ध चुरशीच्या खेळातही विजय मिळवत संघाने क्वार्टर फायनल गाठले.
क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्मीनारायण विद्यालय, वाकडी यांच्याशी अतिशय अटीतटीचा सामना झाला. मात्र न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीरने उत्कृष्ट खेळ दाखवत विजय मिळवला. या कामगिरीनंतर संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला.
सेमी फायनलमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, पिंपरी निर्मळ विरुद्धचा सामना रोमांचक ठरला. सलग दोनदा सामना टाय झाल्यानंतर तिसऱ्या फेरीत सावळीविहीर विद्यालयाने पिंपरी निर्मळला पराभूत करत फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.
फायनलमध्येही सावळीविहीरच्या खेळाडूंनी झुंजार खेळ दाखवला, मात्र थोडक्यात पराभव पत्करावा लागला. तरीसुद्धा ही संपूर्ण कामगिरी अविस्मरणीय ठरली.
या यशाचे श्रेय खेळाडूंनी सावळीविहीर गावचे माजी उपसरपंच गणेश कापसे क्रीडा प्रमुख आय. आय. खान सर तसेच स्पर्धेसाठी परवानगी देणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. डहाळे मॅडम यांना दिले.
या भव्य कामगिरीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब जपे पाटील यांनी मार्गदर्शक व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षकवर्ग व ग्रामस्थांनी खेळाडूंच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
0 Comments