अजितदादा कॉलेजजवळ एकास चाकू लावून लुटले



टाकळीभान प्रतिनिधी-मोटारसायकल आडवी लावून फोर व्हिलर अडवून चाकूचा धाक दाखवत ४० हजार रूपये लुटून नेण्याची घटना वडाळ्याजवळील अजितदादा पॉलिटेक्निक कॉलेजजवळ घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अशोक विठोबा खंडागळे, रा. टाकळीभान हे दुपारी १२.४५ वा. त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीने श्रीरामपूरकडे येत होते. वडाळ्याजवळ त्यांची गाडी मोटारसायकलने अडवली व त्यांना चॉपरचा धाक दाखवून त्यांच्याकडील ४० हजार रूपयांची रोकड बळजबरीनेकाढून घेतली.

 याप्रकरणी अशोक विठोबा खंडागळे यांच्या फिर्यादीवरून विजय उर्फ लाल्या किशोर मैड व एक अनोळखी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments