दिलीप शिंदे
सोयगाव दि.२१- कन्नड - सोयगाव विधानसभा सदस्या आमदार संजना जाधव यांनी बंजारा (लमान) समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा असे मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना केलेले असल्याने याला विरोध करीत आदिवासी बांधवांनी आमदारांचा ताफा अडवित त्यांनी दिलेले निवेदन मागे घ्यावे या बाबत आदिवासींनी आमदारांना निवेदन दिले.
दरम्यान आमदार संजना जाधव यांनी मराठवाड्यातील कन्नड सोयगाव मतदारसंघातील बंजारा (लमान) समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा असे मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना केलेले आहे. आम्ही देखील या मतदारसंघात अनाधी काळापासून वास्तव्यास असून दऱ्या डोंगरात राहून उदरनिर्वाह करतो.आपण आमच्या अमानाची कुठलीही विचार पूस न करता आमच्यावर अन्याय होईल या हेतूने जाणून बुजून इतर समाजाला आमच्या प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी निवेदन देतात ते योग्य नाही.आमच्या जातीचा यासाठी कायम विरोधच राहील.अशी दुटप्पी भूमिका आपण ओजवी करिता निवेदन देत आहोत.याची दखल घ्यावी.या मतदारसंघात सर्व गावागावांत एसटी समाज आहे.या समाजाचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा आहेत हे आपण विसरलात,आमच्या भावना दुखावतील हाच आपला प्रयत्न दिसून येतो.आपण आपले निवेदन मागे घ्यावे अन्यथा सर्व समावेशक भूमिका मांडावी असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर वडगाव तिग्जी सरपंच सुनील लाडके, दस्तापूर उपसरपंच दशरथ शिंगाडे, आरपीआय तालुकाध्यक्ष सुदाम लाडके, राहुल विरकर, किशोर तातळे, बन्सीलाल विरकर, आप्पा नरवाडे, भूषण करवंदे,किरण घोडे, सुनील बिरारी, भिका नरवाडे, अंबादास मोरे, रमेश मोरे, देवराम मुठे, मनोज विरकर, अनिल नरवाडे, प्रविन विरकर,गणेश मुठे, परविन घोडे, पिंटू नाईक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देते समयी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments