लोणी( वार्ताहर)
प्रवरा नदीकाठच्या भागांना परतीच्या पावसाने मोठे प्रमाणात नुकसान सोनेगाव चणेगाव हनुमंत धानोरे येथे परतीच्या मुसळधार पावसाने इंदिरानगर येथे गल्लीत घरात पाणी गेले.
या भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे सामान गृह उपयोगी वस्तू वाहून गेल्या पावसाच्या पाण्याचा वेग इतका होता की टू व्हीलर वाहने सुद्धा ओडून नेली पाण्याने शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सगळा परिसर पाणीच पाणी झाल आहे चणे गावातील ज्ञानेश्वर शिंदे शेतकरी यांचे जनावरांचा साटेल चारा वाहून गेला इतर गोष्टीही व जनावरां चे गोठ्यात अक्षरश पाणीच पाणी मुक्या जनावरांना खाली बसण्यास जागा नसल्याने जनावरे सुद्धा अक्षरशा ताट कळून गेली अक्षरशा पिकामध्ये गुडघ्या एवढे पाणी साचलेले होते शेतकऱ्यांचे पिके सडून जाण्याच्या परिस्थितीत झाली आहे. या झालेल्या हनुमंत गाव नुस्कान पाहणी करताना प्रवरा सहकारी कारखान्याचे संचालक श्री अशोक घोलप सर ,हनुमंत गाव ग्रामसेवक श्री भालेराव साहेब ग्राम सदस्य श्री सुभाष ब्राह्मणे ,राष्ट्रीय एकलव्य संघटना चे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर अहिरे ,जनसेवा फाउंडेशन श्री गायकवाड साहेब ,या ठिकाणी येऊन पाहणी केली इंदिरानगर हनुमंत गाव येथे घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने 15,महिला व 16,पुरुष शाळेच्या खोल्यांमध्ये शिफ्ट केले आहे.
याप्रसंगी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ग्रामसेवक तलाठी आरोग्य सेवक महावितरण कर्मचारी उपस्थित झाले आहे याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक ,ग्रामस्थ सेवक ,तलाठी ,आरोग्य डॉक्टर, महावितरण कर्मचारी या सर्वांचे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पिंपळे ,यांनी आभार व्यक्त केले
सत्तेचा महासंग्राम न्यूज
प्रतिनिधी साबळे ज्ञानेश्वर
0 Comments