रिपब्लिकन युवा सेनेचे राहुरी तालुका शहर शाखेचे नुकतेच झाले उदघाट्न शाहू, फुले, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांची पदनियुक्ती तसेच पक्ष प्रवेश



राहुरी तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व रिपब्लिकन युवा सेनेचे कार्यकर्ते तसेच विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नातू इंदू मिलचे प्रणेते, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती सन्माननीय आनंदराज आंबेडकर ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रिपब्लिकन युवा सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय किरण भाऊ घोंगडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव ह्यांच्या अध्यक्षते खाली मिशन कंपाऊंड राहुरी येथे रिपब्लिकन युवा सेनेची बैठक व राहुरी शहर शाखेचे उदघाटन सोहळा व पदनियुक्ती गुरुवार दि.२५ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटा मध्ये पार पडला.
ह्या कार्यक्रमा निमित्ताने रिपब्लिकन युवा सेनेचे राहुरी शहर शाखेचे उदघाटन तसेच पदनियुक्ती करण्यात आली.
शाहू, फुले, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते स्वप्नील मधुकर लोखंडे ह्यांची राहुरी शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच अमित बाळाजी शिरसाठ ह्यांची राहुरी शहर उपाध्यक्ष पदी  साहिल मुकुंद पठाण ह्यांची महासचिव पदी तर मयूर संदीप माळी ह्यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
ह्या कार्यक्रमा साठी चंद्रकांत जाधव जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना, अमोलजी मकासरे जिल्हा महासचिव, चांगदेवजी भिसे जिल्हा उपाध्यक्ष, विधाटे सर जिल्हा सचिव, प्रवीण गायकवाड राहुरी तालुका प्रेस मीडिया अध्यक्ष, बावस्कर म्याडम आदिवासी समाज पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष, सुरेखा ताई गुंजाळ महिला युवा अध्यक्ष, योगेश पवार राहुरी तालुका अध्यक्ष, अनिल साठे तालुका उपाध्यक्ष आदी फुले,शाहू आंबेडकर चळवळी तील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments