दिलीप लोखंडे
टाकळीभान: रयत शिक्षण संस्थेच्या , टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु . सुप्रिया प्रसाद कदम हिने दिंडीगुल (तामिळनाडू ) येथे झालेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहावा क्रमांक संपादन केला आहे
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु . सुप्रिया प्रसाद कदम हिची २४ सप्टेंबर २०२५ रोजी दिंडीगुल ( तामिळनाडू) येथे झालेल्या सब ज्युनियर नॅशनल बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली होती .या स्पर्धेत कु . सुप्रिया कदम हिने दमदार कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर सहावा क्रमांक संपादन केला आहे . तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मंजाबापू थोरात, राहूल पटारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. शिंदे , पर्यवेक्षक एस.एस जरे, क्रीडा विभाग प्रमुख एस .एस . राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले ,संदीप जावळे, रवी गाडेसर पंकज जाधवसर, राहुल कोकणीसर,संभाजी पटारेसर, खन्ना थोरातसर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, व टाकळीभान मधील क्रीडा प्रेमींनी तिचे अभिनंदन केले आहे .
0 Comments