लोहगाव (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात नुकतीच कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती समारंभास रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, माजी विद्यार्थी डॉ. विवेक मुरूमकर, माजी विद्यार्थी समीर घाडगे, राजेंद्र कापसे, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य भीमराव आंधळे हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचे हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी संकुलात कर्मवीर जयंती साजरी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले. यावेळी संकुलाचे माजी विद्यार्थी, थोर देणगीदार समीर घाडगे,व रमेश घाडगे यांनी कन्या विद्यालयास दहा इंट्रॅक्टिव पॅनल बोर्ड, राजेंद्र कापसे यांनी साऊंड सिस्टिम, डॉ. विवेक मुरूमकर यांनी एक लाख रुपये विद्यार्थी बक्षीस ठेव, अलका आहेर, डॉ. शरद दुधाट, प्रतिभा ठोकळ, राजेंद्रकुमार क्षीररसागर, प्रकाश गहिरे, मुमताज शेख यांनी संकुलास दिलेल्या भरीव आर्थिक देणगीबद्दल व उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, विकास कांगुणे व सुभाष भुसाळ यांनी देणगी मिळवून दिल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर रमेश निकाळे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सन्मान करण्यात आला. यावेळी राजेंद्र कापसे, समीर घाडगे, श्रीराम मुरूमकर यांनी विद्यालयाच्या विविध आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. सचिव विकास देशमुख यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आशिया खंडातील शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून रयत शिक्षकांनी गुणवत्ता जोपासणे विषयी इच्छा व्यक्त केली. गतवर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाचे निवेदन डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी संकुलाच्या वतीने नरेंद्र ठाकरे, पल्लवी कुदळ, संगीता उगले व अलका आहेर यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार तर धनश्री वाघ यांना शिक्षकेतर सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, सुधीर म्हस्के, रमेश शिंदे, मधुकर अनाप, अंगद काकडे, विजय पाटील, हरिभाऊ चौधरी, भाऊसाहेब पेटकर, नानासाहेब गांगड, गोरक्षनाथ बनकर, बी.डी. पवार, रतिलाल भंडारी, चंदूभाई तांबोळी, महेश वाघचौरे, सविता घाडगे, सौ. मुरूमकर, शोभा चौधरी, अलका मते, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय इनामके, श्री. देव्हारे, सुंदरबापू घोरपडे, नारायण जाधव, कचरू जोर्वेकर, संजय ठाकरे, बाबासाहेब अंत्रे आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका वर्पे, प्रतिभा ठोकळ व संगीता उगले यांनी केले तर मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांनी आभार मानले.
0 Comments