शिर्डी (प्रतिनिधी)केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना.अमीतजी शाह यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री मा.ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉ सुजय दादा विखे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला एन.सी.डी.सी च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध झाल्याने कारखान्याचे नुतणीकरण पुर्ण झाले असून १५ ऑक्टोबर २०२५ रोजी नवीन गाळप हंगामाचा शुभारंभही करण्यात येणार आहे.
तसेल लोणी बुद्रुक येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील व आदरणीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पिंप्री निर्मळ, अस्तगाव माथा येथे पं.पू.प्रदिपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजनही दि.१२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या तीनही सोहळ्यांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास मा.ना.अमीतभाई शाह यांना निमंत्रीत करण्यात आल्याचे समजते.
या सर्व कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याच्या केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील ऑक्टोबर महीन्यात मा.ना.अमितभाई शाह प्रवरानगर दौ-यावर येणार आहेत. असे समजते.
0 Comments