शिर्डी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बुद्रुक येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत कार्यक्रमाला आकर्षक व अनोखे स्वरूप दिले.
या कार्यक्रमात इयत्ता दहावीचा विद्यार्थी आयुष लखन साबळे याने मुख्याध्यापकांची भूमिका तर कुमारी पुनम अनिल कुसाळकर हिने उपमुख्याध्यापिकेची भूमिका साकारली. इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिपाई यांच्या भूमिका निभावत शालेय वातावरणाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सौ. डहाळे मॅडम यांनी भूषविले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी शिक्षकांचे समाजातील योगदान व विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान अधोरेखित केले.
शिक्षक मनोगतातून सौ. कानडे मॅडम व श्री. खेडकर सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनीही आपले विचार व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता दर्शविली. विशेष म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत पुष्पगुच्छ व पेन देऊन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. म्हस्के सर, श्री. काळेगोरे सर, श्री. खान सर, श्री. धीवर सर, श्री. वाकचौरे सर, श्री. लोखंडे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
0 Comments