नागरिकांनी आसपासचा परिसर स्वच्छ करून ,आरोग्याची काळजी घ्या डॉ, उन्मेश लोंढे

टाकळीभान प्रतिनिधी :-माळवाडगाव व परिसरामध्ये गोचीड ताप व डेंगू सदृश आजाराच्या साथींमध्ये वाढ... रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली... नागरिकांनी काळजी घेण्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश लोंढे यांनी आवाहन केले.
          सततच्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी, गटारी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गोचीड ताप व डेंगू सदृश आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या या आजारांनी वाढत आहे तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उन्मेश लोंढे व डॉ जाधव यांनी केले आहे. सततच्या पावसामुळे पाण्याचे डबके, गटारी साचल्या असून गवत झुडुपे वाढली आहेत त्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गोचीड ताप डेंगूसदृश आजारांचे रुग्ण वाढत आहेत.
       यावेळी डॉ. उन्मेश लोंढे यांनी नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले असून काही उपाययोजना याविषयी माहिती दिली आहे. गोचीड तापो डेंगूसदृश आजार यांना प्रतिबंध करण्यासाठी डासांपासून बचाव करणे आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखणे, अति गोचीडांपासून स्वतःचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच घरातील आणि बाहेरील भागात साठलेले पाणी काढून टाकावे , कोरडा दिवस पाळावा तसेच शरीर झाकले जाईल असे कपडे घालावे डासांपासून बचाव करण्यासाठी डास प्रतिबंधक उपकरणांचा मच्छरदाणी वगैरे यांचा वापर करावा शक्यतो गर्दी च्या ठिकाणी जाणे टाळावे गेल्यास मास्क चा वापर करावा तसेच गावामध्ये सर्वत्र फवारणी करावी, गवताळ किंवा झाडीच्या भागातून फिरताना पूर्ण हातपाय झाकतील असे बंदिस्त जाड कपडे घालावे, कचरा आणि अस्वच्छतेवर डास यांची उत्पत्ती होत असल्याने आपल्या घरातील व घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच प्रा आ केंद्र मार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे . पावसाळ्याच्या दिवसात पाण्यात ही बदल होत असल्याने खोकला ,ताप, सर्दी यासंबंधी काही लक्षणे आढळल्यास माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. उन्मेश लोंढे व डॉ पांडुरंग जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments