सिद्धीविनायक मंचाने केला नारी सन्मानाचा जागर



टाकळीभान प्रतिनिधी:- श्रीरामपूर येथे हळदी कुंकू, धार्मिक सोहळे, उत्सवांमध्ये विधवा, एकल महिलांना दूर ठेवण्याच्या जुन्या रूढी, परंपरेला बाजूला सारत देवीचा जागर होणाऱ्या नवरात्रोत्सवात एका एकल महिलेलाच म हिला मंचाचे अध्यक्ष बनवून नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकल भगिनींच्या हस्ते आरती करीत देवीची प्रतिष्ठापणा करण्याचा मान देत सन्मानित करण्यात आले.
    श्रीरामपुरातील मोरगे वस्तीच्या सिद्धीविनायक महिला मंचाने नारी सन्मानाचा, सम तेचा जागर करून परिवर्तनाचे एक पाऊल पुढे टाकले. श्रीराम पूर शहराच्या मोरगे वस्ती वॉर्ड क्रमांक ७ येथे सिद्धीविनायक मंदिर आहे. मंदिरात परिसरातील नागरिकांच्या वतीने विविध कार्यक्रम, सण, उत्सव साजरे होत असतात. यंदा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी परिसरातील महिलांनी एकत्र येत सिद्धीविनायक महिला मंचाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
   मंचाचे अध्यक्षसंगिता कुरूंद. उपाध्यक्ष शीतल भंडारी, खजिनदार प्रभा सुरडकर, सचिव स्नेहल लचके यांच्यासह ज्योती शिंदे, सविता सुपारे, वैशाली शेळके, सन्मानित केले.
  यावेळी वैशाली शेळके, वर्षा शिंदे, सीमा संग्रामे, अमृता गायकवाड, चैताली सुरडकर, शीतल देशमुख, श्रद्धा लचके, दीपिका ठोंबरे, मनीषा शिंदे आदींचा या मंचाम ध्ये समावेश आहे. अध्यक्ष संगिता कुरूंद या साऊ एकल महिला समितीच्या पदाधिकारी आहेत. समितीच्या पुढाकाराने श्रीरामपूरमधील आझाद मैदान येथील ७५ वर्षांच्या मानाच्या सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशोत्सवात एकल महिलांच्या हस्ते गणपतीची आरती करून
या सर्व महिलांनी केशरी फेटे बांधून संगीत वाद्याच्या तालावर ठेका धरीत मि रवणुकीत उत्साहाने सहभागी होऊन देवीचे स्वागत केले. एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल महिला समितीचे मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, मुकुंद टंकसाळे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.याप्रसंगी मंजुषा गायकवाड, वंदना काळे, दुर्गा नाटकर, अरूणा शेळके, माया जंजिरे, शालिनी ससाणे, पूजा ताथेड, सुलताना शेख आदी सहभागी झाल्या होत्या. त्यांना सिद्धीविनायक महिला मंचाच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments