विजय बोडखे
राजुरी वार्ताहर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय,गोगलगाव विजेता ठरला आहे.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडाकार्यालय व प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी व खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय गोगलगाव यांच्या संयुक्त विद्यामाने तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या मध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद व १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळविल्याची माहिती मुख्याध्यापक श्री.कैलास म्हस्के सर यांनी दिली.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात अपेक्षा सातकर,ईश्वरी गुळवे,रिहाना पठाण, दिक्षा घोडे,आसावरी खाडे,आदिती देवकर या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन केले यात या खेळाडूंनी पी.जी.एम एस लोणी यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला.या स्पर्धेत ईश्वरी गुळवे हिने सुंदर खेळाचे प्रदर्शन केले,त्यांना श्री सुनिल चोळके सर यांचे खेळाचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील , माजी मंत्रीव जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील,माजी खासदार सुजयदादा विखे पाटील,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता ताई विखे पाटील, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे मॅडम, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष, गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन तसेच सर्व शिक्षक व गोगलगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
0 Comments