लोणी बु! (बाळासाहेब विखे पाटील नगर) येथील साई संघर्ष ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न


लोणी (वार्ताहर)

*माणसाने माणसाशी माणसासम वागावे* या म्हणीप्रमाणे हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आपला लाडका गणपती बाप्पा लोणी बु, बाळासाहेब नगर येथील साई संघर्ष ग्रुप बाळासाहेब विखे पाटील नगर मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले .
यामध्ये सर्व जाती धर्माचा यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी या महोत्सवात उस्फूर्त सहभाग नोंदविला सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध प्रकारचे खेळ संगीत खुर्ची कीर्तन भजन, भारुडे असे विविध लहान मुलांमधील असलेले कला स्टेजवर सादर  करण्यात आले यावेळी महिला आपले संध्याकाळचे स्वयंपाक पाणी उरकवत सर्व कुटुंब ,कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवायचे कुठलाही भेदभाव न करता सर्व जाती धर्माचे लोक या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आरतीला आवर्जून हजर  असतात हिंदू धर्मातील असा सर्वात मोठा एकमेव उत्सव आहे की त्यात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहात सहभाग घेतात गणेश तरुण मंडळाच्या वतीने नव्या दिवशी मोठ्या भक्ती भावाने महाप्रसादाचा आयोजन केले होते  या तरुणांचा अतिशय उत्साह व एकोपा दिसून येत होता यावेळी   मंडळातील सदस्य अजय शेळके याचा साई संघर्ष गणेश मित्र  मंडळाच्या वतीने केक कापून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी (सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार )ज्ञानेश्वर साबळे,  योगेश पगारे ,सुनील नवगण ,पंकज कांदळकर ,दीपक दिवेकर , प्रवीण घाणे, निलेश गायकवाड ,सोमनाथ आहेर ,अभिजीत साबळे ,संतोष पगारे पप्पू सूर्यवंशी, ओम नवगण, किशोर कोहकडे , अक्षय गिरी, रवी मोरे, कृष्णा रत्नपारखी, नितीन मोरे ,दत्ता  रत्नपारखे ,ऋषी जानवे पवन कांदळकर मयूर शिंदे ,अमन शेख ,शुभम भोसले ,नयन वाघमारे आदी.

Post a Comment

0 Comments