लोकनेते सहकारमर्षी कै. बाबुरावजी काळे यांचे वेताळवाडी मध्यम प्रकल्प फलकावरील असलेले नाव पुसले, नागरिकांमधून संताप --




दिलीप शिंदे 
सोयगाव दि. ११ -  लोकनेते तालुक्याचे भाग्यविधाते व वेताळवाडी धरणाचे निर्माते कै. बाबुरावजी काळे यांच्या कार्याचा गौरव म्हणून   दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने वेताळवाडी मध्यम प्रकल्पाला कै.बाबुरावजी काळे जलाशय असे नामकरण करण्यात आले होते.त्या फलकावरील कै. बाबुरावजी काळे यांचे नाव पुसल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी, लोकनेते, सहकार महर्षी कै. बाबुरावजी काळे यांचे या मातीस अमृततुल्य योगदान असून त्यांनीच हे वेताळवाडी धरण बांधले आहे. व सद्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असून त्या निमित्ताने त्यांच्या  कार्याचा गौरव म्हणून या धरणास सर्वानुमते जनतेच्या मागणी नुसार पुष्पा काळे यांच्या संकल्पमेतून व सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या सहमतीने दि.९ सप्टेंबर २०२४ सोमवारी"लोकनेते बाबुरावजी काळे जलाशय" हे नाव देण्यात आले व तसा फलक ही त्या भागात लावण्यात आला होता. याच फलकावर असलेले गौरव व  कै. बाबुरावजी काळे हे नाव पुसल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आल्याने तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. या नामकरण सोहळ्यात  माजी नगराध्यक्ष कैलास काळे, सुनिल गावंडे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) माजी तालुकाध्यक्ष इंद्रजित सोळंके, भाजप माजी तालुकाध्यक्ष बद्री हजारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे, भाजपाचे जेष्ठ नेते वसंत बनकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष (शरद पवार गट) रवि काळे, भाजप माजी शहराध्यक्ष योगेश पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर मनगटे, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख रवींद्र काटोले, विजय गव्हाड, दिपक देशमुख, अरुण काळे, संजय तायडे, मुन्ना ढगे, अनिस तडवी, समाधान आगे, कृष्णा पाटील, नागरिक व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान याप्रकरणी राजकीय नेते काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

चौकट:- लोकनेते सहकारमर्षी, सोयगाव तालुक्याचे भाग्यविधाते कै. बाबुरावजी काळे यांचे दि.९  मंगळवारी जन्मशताब्दी वर्षाच्या दुसऱ्या दिवशी वेताळवाडी जलाशय फलकावरील कै. बाबुरावजी काळे नाव पुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी राजकीय नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असा खोडसाळपणा करणाऱ्यावर काय कारवाई केली जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments