श्री साईंच्या दर्शनामुळे मोठी ऊर्जा व मिळते प्रेरणा!--केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या दर्शनामुळे दुःख, मनाची अशांती दूर होते. असे सांगत साईबाबा सर्वांचे दुःख, संकट दूर करो, असे म्हणत आपण प्रथमच शिर्डीला श्री साई दर्शनाला आलो व साई दर्शनामुळे मोठे समाधान व आनंद झाला. नवी प्रेरणा मिळाली. ‌ असे केंद्रीय ऊर्जामंत्री नामदार मनोहरलाल कट्टर यांनी म्हटले आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर हे गुरुवारी शिर्डीला आले. 




त्यांनी श्री साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले .त्यानंतर साई संस्थांनच्या वतीने त्यांचा संस्थांनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी श्री साई मूर्ती शाल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, शिर्डीत साईबाबांमुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून साईभक्त मोठ्या प्रमाणात येतात. येथे आलेल्या देणगीतून साई संस्थान रुग्णसेवा, प्रसादलय अशा साई भक्तांसाठी विविध सेवा देतात. साईबाबा सर्वांचे दुःख संकटे दूर करतात. असे सांगत साईबाबांच्या दर्शनामुळे एक नवी ऊर्जा ,प्रेरणा मिळते व या प्रेरणेतून देश सेवेचे  अधिक चांगले काम घडावे. अशी त्यांनी यावेळी साई चरणी इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले. साईबाबांनी त्यावेळी जे कार्य केले ते खूप मोठे असून ते कार्य आजही त्यांचा आदर्श घेऊन केले गेले पाहिजे. कारण त्यांच्या संदेश व आदर्शाची आज खूप गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments