लोहगाव (वार्ताहर)
देशाच्या उभारणीत आगामी काळासाठी गाव पातळीवर सविस्तर विकास आराखडे तयार करून विविध इतर विकास योजनांचे अभिसरण करून जिल्ह्यात आदि कर्मयोगी अभियान राबवले जाणार आहे. या अंतर्गत गावकरी व गावातील विविध घटकांच्या मदतीने गावाच्या विकासासाठी आवश्यक विकास कामांची माहिती संकलित करून आराखडा तयार करण्यात येणार आहे.
या उपक्रमात शेवटच्या टप्प्यावरील सेवा वितरणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते व ग्राम परिवर्तन नेत्यांचा गट तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात जन भागीदारी व पीएम जनमन या योजनांचे अभिसरण करण्यात येणार असून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानामध्ये जिल्ह्यातील 118 गावांमधील सुमारे 1 लाख 17 हजार 593 लाभार्थ्यांपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचविण्यात आल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून पुढील विकास साधण्यात येणार आहे.
यापूर्वी गावाच्या उत्पन्न स्त्रोतांवर आधारित गाव पातळीवरील वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखडे तयार केले जात असत. या नियोजनांतर्गत योजनांमध्ये नीधीच्या मर्यादा असल्याने काही कामे ग्राम विकास विभागातर्फे केली जात असे. मात्र ग्राम विकास विभागाला देखील निधीची मर्यादा असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील महत्वाकांक्षी विकास योजनांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत भविष्यात निधी उपलब्ध करून देण्यासाठी आदि कर्मयोगी अभियान महत्त्वाचे ठरणार असून गावपातळीवरील आराखड्यांचे केंद्र शासनापर्यंत संकलित माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी व पारनेर तालुक्यातील 118 गावांमध्ये आदी कर्मयोगी अभियान राबविण्यात येणार असून स्थानिक स्वयंसेवक, बचत गट, आदिवासी नेते, सेवाभावी संस्था, आशा सेविका इत्यादी अंतर्भूत असणारे आदीसाथी तसेच शिक्षक व्यावसायिक मार्गदर्शक यांचा सहभाग असणाऱ्या आदि सहयोगी यांचेमार्फत आदी कर्मयोगी अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विकास आराखड्यात गावातील सर्व घटकांचे समन्वय व नागरिकांचा सहभाग घेऊन आराखडा तयार केला जाणार आहे.
(उपक्रमाची आखणी अशी
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी व पारनेर या चार तालुक्यांमध्ये आदी कर्मयोगी अभियान राबविण्यात येणार असून 08 जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर (DMT) यांचे मार्फत 22 ब्लॉक मास्टर ट्रेनर्स (BMT) यांचे 03 दिवसांचे प्रशिक्षण सत्र दिनांक 8 ते 10 सप्टेंबर, 2025 यादरम्यान कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर ता. राहता येथे संपन्न झाले.)
0 Comments