श्रीरामपूरातील तालुकास्तरीयक्रिडा स्पर्धेतील कबड्डीतभोकरच्या श्री जगदंबा प्रासादिकविद्यालयाचा संघ विजेता



टाकळीभान प्रतिनिधी - अहिल्यानगर जिल्हा परीषदेच्या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व श्रीरामपूर तालुका क्रीडा समीती यांचे संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत अहमदनगर जिल्हा जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भोकर येथील श्री जगदंबा प्रासादिक विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहीती विद्यालयाचे मुख्याध्यापक केशव जाधव व पर्यवेक्षक राजेंद्र आदमाने यांनी दिली आहे.

     श्रीरामपूर शहरातील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्याललकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षीय कबड्डी गटामध्ये मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील 32 संघांनी सहभाग नोंदविला त्यातील अंतिम सामन्यात अशोकनगर येथील रामराव आदिक पब्लीक स्कुलच्या संघाचा भोकर येथील श्री जगदंबा प्रासादिक विद्यालयाच्या संघाने 36-18 गुणांच्या फरकाने विजय संपादीत करून प्रथम क्रमांक पटकाविला.

या संघाचे कर्णधारपद येथील आकाश संदिप साळवे याने भुषविले. या संघात सुयोग काळू गायकवाड, आर्यन किरण मांजरे, रणवीर निवृत्ती सुपेकर, आयुष लक्ष्मण अमोलीक, आनंद रवींद्र बर्डे, पुनीत उद्देश आल्हाट, ऋषीकेश विलास डूकरे, परशुराम हनुमान सुपेकर, प्रतिक राधाकीसन पवार, जयेश नानासाहेब आबुज, श्रेयस दत्तात्रय साळुंके यांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक केशव जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र आदमाने, क्रिडाप्रमुख सचीन शिंदे, प्रविण लोखंडे, आनंद रूपटक्के, श्रीमती कल्पना म्हस्के, श्रीमती पुजा सरोदे, संजय सकट तसेच येथील जगदंबा स्पोर्टस् क्लबचे प्रशिक्षक भाऊराव सुडके, गणेश पवार व युवराज सुडके यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व स्तरावर विजय संघाचे अभिनंदन केले जात आहे,

Post a Comment

0 Comments