श्रीरामपूर प्रतिनिधी
ऑफ इंडिया महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष रमादेवी धीवर मॅडम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मॅडम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनिफ भाई पठाण, शिवस्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण, सामाजिक कार्यकर्ते विशाल मोजे, सिकंदर भाई तांबोळी, युसूफ भाई शेख, अविनाश भोसले, अलोक थोरात, रमिज पोपटिया, हारून भाई तांबोळी, शिवकुमार लाहरिया, सिद्धार्थ चांडवले, बाळासाहेब बागुल, संदिप शेठ शेडगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वाढदिवस सोहळ्यात मान्यवरांनी रमादेवी धीवर मॅडम यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत सांगितले की, समाजातील वंचित, शेतकरी, महिला व युवकांसाठी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये प्रेरणा निर्माण झाली असून भविष्यातही त्या समाजकार्यासाठी अग्रसर राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
0 Comments