दिलीप शिंदे
सोयगाव दि.११ -- तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत बनोटी येथील जिल्हा परिषद प्रशालेचा इयत्ता १० वी चा विद्यार्थी चेतन मनोज पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला.
तालुका स्तरावर बनोटी जिल्हा परिषद प्रशालेचे नाव लौकीक केलेल्या धावपटू चेतन पाटील याचे शाळेचे शिक्षक जगदीश जगताप व मुख्याध्यापक यांनी पुष्पगुच्छ देत गौरव करण्यात आला.यावेळी बनोटी ग्रामपंचायत चे सरपंच मुरलीधर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाब शिंदे, आर.डी. सोनवणे,जी.एम. बोरसे,बि.एच.पाटील , डी.आर.नलावडे, श्रीमती पी. जी.पेटकर , आर.एम.नगरे,एस. के. गायकवाड ,मनोज पाटील,जे.जे. सैय्यद , शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments