तालुकास्तरीय १९ वर्षे वयोगटातील कबड्डी स्पर्धेत जे.एम.एस. उच्च माध्यमिक विद्यालयचे यश --



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.११ -- सोयगाव येथील कै. बाबुरावजी काळे विद्यालयाच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात जे.एम.एस. उच्च माध्यमिक विद्यालय बनोटी व फर्दापूर यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात जे.एम.एस. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला.

 भोलेनाथ पवार, विनय राठोड, शुभम कोलते, अक्षय राठोड, सोपान तवर, नितेश राठोड, भूषण राठोड, सागर चव्हाण,रितेश चव्हाण, सचिन राठोड, प्रतीक चव्हाण व शिरीष राठोड विजयी संघात या खेळाडूंचा समावेश होता. १९ वर्षे वयोगटात कबड्डी तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेला विजयी संघाचेप्राचार्य संगीता खैरनार, डी आर पाटील,  एल.के पांडे, आर. बी. जाधव, एस. जी. राठोड, पानपट्टे सर, पी. वार. काटकर, व्ही.एम. बागुल, विठ्ठल राठोड, व संस्थाचालक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments