हरितवारी -संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्त शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षां निमित्ताने गनोरी येथील आश्रमात वारकरी संप्रदायात पूजनीय सुवर्ण पिंपळ व अजानवृक्षाचे रोपण -



दिलीप शिंदे
सोयगाव दि.११--१५ ऑगस्ट पासुन विश्व गुरु संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सातशे पन्नासवे सुवर्ण जयंती वर्ष सुरु झाले आहे. या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने सिल्लोड येथील  अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी आपल्या हरितवारी या उपक्रमातून गनोरी येथील श्रीक्षेत्र सोनगड- संत रामलाल बाबा आश्रमाच्या प्रांगणात दुर्मिळ सुवर्ण पिंपळ व अजाण वृक्षाचे ५ झाडे मठा धीपती  हभप. ज्ञानेश्वर महाराज राऊत यांच्या समवेत रोपण केली व संगोपणाचे पालकत्व देवस्थानाने स्वीकाराले आहे. आळंदी येथे सुमारे अडीच हजार वर्ष पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्ष जो भारतातील सर्वात प्राचीन वृक्ष असून तो साक्षात धनाची देवता कुबेराने लावला आहे अशी अख्यायिका आहे.
 या देव वृक्षा समीप ज्ञानेश्वर महाराज यांनी साधना केली आहे. या वृक्षाचे बीज संकलन डॉ. पाटील यांनी करून रोपं निर्मिती केली आहे, तसेच माऊलिंच्या समाधी स्थळी व सिद्ध बेटात पवित्र व आठ शे वर्ष प्राचीन अजाणवृक्ष आहे. त्या मुळं मातृ वृक्षाच्या बिजा पासुन ही रोपं निर्माण करून  ती राज्यभर विविध देवस्थान, मंदिर आदी ठिकाणी  लावली आहेत. सदर वृक्षांचे फुलं, फळं, ही अनेक फुलापखरे, पक्षी, वट वाघूळ, मधमाशा यांनाअन्न मिळावे व अधिवास हेतू उपयोगी असल्याने अध्यात्मातून  पर्यावरण व जैवविविधता संवर्धन व्हावे म्हणून हे रोपण केले आहे असे पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments